शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना तीन दिवस टाळे : कामकाज पडले ठप्प

By जितेंद्र दखने | Updated: December 18, 2023 21:03 IST

एकाच वेळी १८ ते २० डिसेंबरदरम्यान कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

अमरावती: राज्यातील ग्रामपंचायतींसंदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक संघटना एकाच वेळी १८ ते २० डिसेंबरदरम्यान कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कारभार ठप्प झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शासन व प्रशासनाने न्यायिक मागण्या सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे, सरचिटणीस आशिष भागवत, प्रशांत टिंगणे, मनीष इंगोले आदींसह पदाधिकारी व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते...अशा आहेत ग्रामसेवकांच्या मागण्याग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी त्यांच्याकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करावी, ग्रामवेक पदाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी, शैक्षणिक अर्हता कोणत्याची शाखेची करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९८५चे कलम ४९चे नियमात सर्व जिल्हा परिषदांच्या प्राप्त अहवालानुसार सुधारणा करावी, विस्तार अधिकारी पदाची संख्या वाढवावी, प्रशासनात दिरंगाईमुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्ती दिलेले मात्र १ नोव्हेंबर २००५ पूर्वी भरतीप्रक्रिया चालू झालेल्या ग्रामसेवकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करावी, शिक्षकांप्रमाणे ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व मिळावे आदी मागण्याचा समावेश आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती