शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

८४० थकीत मालमत्ता धारकांना बजावल्या नोटीस

By admin | Updated: March 30, 2015 00:01 IST

अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी असताना महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.

अमरावती : अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी असताना महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. मोठी थकबाकी असलेल्या ८४० मालमत्ता धारकांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहकार्य न केल्याने काहींना जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत.सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात मालमत्तांचे उत्पन्न ४० कोटी गृहित धरण्यात आले होते. त्यानुसार ७५ टक्के वसुलीचा टप्पा गाठला गेला. १५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून तिजोरीत २५ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते. सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मालमत्ताकरातून ५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार मालमत्ताकराची रक्कम समाविष्ट करुन अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र, यापूर्वी करवसुली दरम्यान आलेला अनुभव लक्षात घेता प्रशासनाने वर्षांतून दोन वेळा देयके नागरिकांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांना कराचा भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. पाचही झोनमध्ये सहायक आयुक्तांवर मालमत्ता वसुलीची जबाबदारी आयुक्त अरुण डोंगरे यांनी सोपविली आहे. मालमत्ता कराच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मुभा सहायक आयुक्तांना प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार कर वसुलीसाठी नोटीस बजावणे, मालमत्तांना टाळे लावणे, दंडात्मक रक्कम वसूल करणे आदी कारवाई सतत करण्यात आली आहे. मात्र अनेकांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम त्वरित वसूल व्हावी, यासाठी थकीत ८४० मालमत्ताधारकांना नोटीस बजावून जप्तीची ताकीद देण्यात आली आहे. आठवडाभरात कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल. महापालिका अधिनियमानुसार ही कारवाई केली जाईल. जप्ती टाळण्यासाठी मुदतीच्या आत कर भरणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. कर वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे मोठी रक्कम थकित आहे, अशांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आठ दिवसात ही कारवाई होईल.-महेश देशमुख, कर व मूल्य निर्धारण अधिकारी सुटीच्या दिवशी करवसुली ३६ लाखमहापालिकेच्या पाचही झोनमध्ये मालमत्ता करवसुलीसाठी शनिवार, रविवार या दोन दिवस विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार तिजोरीत ३६ लाख रुपये जमा झाले आहे. यात पाचही सहाय्यक आयुक्तांसह मंगेश वाटाणे, येलगुंदे, श्रीवास्तव, निकम, गंगात्रे, ज्ञानेश्वर इंगोले, अलुडे, प्रवीण इंगोले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.