शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आठ कोटींच्या विम्यात ८३ कोटींची भरपाई

By admin | Updated: June 20, 2015 00:50 IST

राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप २०१४-१५ पीकविमा योजना राबविण्यात आली होती.

खरीप २०१४ योजना : १ लाख १६ हजार १३० शेतकऱ्यांना होणार लाभअमरावती : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप २०१४-१५ पीकविमा योजना राबविण्यात आली होती. खरिपात पावसाअभावी दुष्काळ स्थिती, पैसेवारी ५० पैशाच्या आत व उंबरठा उत्पन्न आदींच्या आधारे १ लाख १६ हजार १३० शेतकऱ्यांच्या १ लाख १२ हजार ७८२ हेक्टर क्षेत्रासाठी ८३ कोटी ९२ लाख ८८ हजार ४७९ रुपयांचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी ८ कोटी ६ लाख ४२ हजार ८३८ रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला होता. खरिपाच्या पिकाचे पूर चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करुन संरक्षण मिळण्याकरिता ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ५६३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला व १ लाख १२ हजार ७८२ हेक्टर १३२ आर. पीक क्षेत्राचा समावेश होता. गुरुवारी विमा संरक्षित रक्कम निश्चित झाल्याचे विमा कंपनीचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. यानुसार अचलपूर तालुक्यात ४ कोटी ६८ लाख १ हजार ८०८ रुपये, अमरावती तालुक्याला ६ कोटी ९० लाख ९९३ रुपये, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६ कोटी ५२ लाख २८ हजार ४३ रुपये, भातकुली तालुक्यात ६ कोटी ६९ लाख ९५ हजार ४५८ रुपये, चांदूरबाजार तालुक्यात ७ कोटी ९ लाख ३३ हजार ४७४ रुपये, चांदूररेल्वे तालुक्यात ५ कोटी ५९ लाख २५ हजार ६५२ रुपये, चिखलदरा तालुक्यात १ कोटी ३२ लाख ८२ हजार ३२० रुपये, दर्यापूर तालुक्यात ११ कोटी ७६ लाख ८० हजार ५९० रुपये, धामणगाव तालुक्यात ८ कोटी १३ लाख ४४ हजार ४२७ रुपये, धारणी तालुक्यात १ कोटी १७ लाख ३५ हजार ७३४ रुपये, मोर्शी तालुक्यात ३ कोटी ६० लाख ९६ हजार ६५० रुपये, नांदगाव तालुक्यात १२ कोटी ३ लाख ६० हजार ३२२ रुपये, तिवसा तालुक्यात ६ कोटी ९१ लाख २६ हजार ४८६ रुपये, वरुड तालुक्यात १ कोटी ४७ लाख ७६ हजार ४७५ रुपये मिळणार आहे. (प्रतिनिधी)नांदगाव तालुक्याला सर्वाधिक लाभनांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील १७ हजार ५३२ शेतकऱ्यांनी १४ हजार १४७ हेक्टर क्षेत्रासाठी २४ कोटी ७८ लाख २९२ हजार रुपयांचा विमा संरक्षीत केला होता. यासाठी ९३ लाख १५ हजार ९५४ रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला. नुकसान भरपाई पोटी १७ हजार २५२ शेतकऱ्यांना १२ कोटी ३ लाख ६० हजार ३२२ रुपये मिळणार आहे.