शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ८ नोव्हेंबरला सुकाणू समितीतर्फे नोटाबंदीचे वर्षश्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:36 IST

शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे राज्य प्रतिनिधी धनंजय काकडे यांनी दिली.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणामुळेच शेतकरी अडचणीत असल्याचा दावा शेतकरी संघटनेचे राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन

आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे राज्य प्रतिनिधी धनंजय काकडे यांनी दिली.शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी अडचणीत आला असून, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. शहर विकासाच्या नावावर ग्रामीण भागाची लूट होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या वीज बिलाची अन्यायकारक वसुली थांबवावी, यासाठी १ नोव्हेंबरपासून महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांना स्वत:चे कनेक्शन तोडण्याचे आवाहन समितीने केले होते. आता ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध होणार आहेत. संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाच्या रास्त हमीभावासाठी शेतकरी १० नोव्हेंबरपासून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन, दूध व शेतीमाल टाकून घंटानाद करणार आहेत. यानंतरही शासनाला जाग न आल्यास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील व सुकाणू समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांच्या मार्गदर्शनात राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था