शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी ८ कोटी रुपये; नगरपरिषद, नगरपंचायतींनाही आर्थिक लाभ

By प्रदीप भाकरे | Updated: June 2, 2023 19:03 IST

केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगातून महापालिकेला ८ कोटी ८ लाख रुपये देण्यात आले आहेत.

अमरावती : केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगातून महापालिकेला ८ कोटी ८ लाख रुपये देण्यात आले आहेत. याबाबत नगरविकास विभागाने १ जून रोजी शासननिर्णय काढला आहे. पुढील आठवड्यात ती रक्कम मनपाच्या तिजोरीत जमा होईल. त्यातून प्रशासनाला थकीत देयके देणे शक्य होईल.

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत सन २०२२/२३ या वर्षातील पिण्याचे पाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी दिला जातो. त्या बंधनकारक अनुदानाचा दुसरा हप्ता म्हणून राज्यातील ‘ड’ वर्ग मनपा, नगरपालिका व नगरपंचायतींना २८६ कोटी रुपये वितरित करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली. या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासह पिण्याच्या पाण्याची साठवण व पुनर्वापरासंबंधी योजनांची अंमलबजावणी करायची असते. मात्र, सर्व लोकल बॉडी तो निधी केवळ घनकचरा व्यवस्थापनावरच खर्च करत असल्याचे निरिक्षण नगरविकास विभागाने नोंदविले आहे. ३० मार्चलाही मिळाले होते ८ कोेटीयापुर्वी ३० मार्च २०२३ च्या शासननिर्णयाद्वारे नगरविकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना २८६.५० कोटी रुपये वितरित केले होते. त्यावेळी अमरावती महापालिकेला ८ कोटी ६ लाख ५३ हजार १५८ रुपये मिळाले होते. आता दोन महिन्यानंतर दुसरा हप्ता म्हणून ८ कोटी ८ लाख ३५ हजार ३०९ रुपये मिळणार आहेत. मनपा फंडातून दिली गेली देयकेविविध विभागातील कंत्राटदारांचा पैशांसाठी वाढता तगादा व सहा सहा महिन्यांची थकीत देयके पाहता, प्रशासन प्रमुखांच्या पुर्वमान्यतेने अनेक देयके ही मनपा फंडातून दिली गेली. मात्र यंदाची एकुणच वसुली पाहता मनपा फंडातून कुणाकुणाची तोंडे बंद करायची, असा प्रश्न यंत्रणेला पडला होता. मात्र, आता पुन्हा नगरविकास विभागाने १५ व्या वित्त आयोगातून ८ कोटी रुपये दिल्याने थकीत व नियमित देयकांचा प्रश्न मिटणार आहे. यांचीही भरली तिजोरीअचलपूर: १.३९ कोटी, अंजनगाव : ६७.९५ लाख, वरूड: ६७.३२ लाख, मोर्शी : ५०.२४ लाख, दर्यापूर :४४.६२ लाख, चांदुररेल्वे : २४.३० लाख, चांदूरबाजार: २२.९० लाख, धामणगाव : २६.०६ लाख, शेंदुरजना :३२.३५ लाख, चिखलदरा: ७.४५ लाख, तिवसा : ३८.३० लाख, धारणी: २१.६६ लाख, भातकुली: १९.९७ लाख व नांदगाव : २७.६७ लाख

टॅग्स :Amravatiअमरावती