मोर्शी : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार, सोमवारी अमरावती जिल्ह्यात ८६९ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले. त्यात मोर्शी तालुक्यातील ७८ कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. सिंभोरा रोड भागात दोन कोरोनाग्रस्त आढळून आले तसेच अजमिरे लेआउट पेठपुरा, माळीपुरा, साई कॉलनी, अप्पर वर्धा वसाहत, प्रभात चौक, दीप कॉलनी येथे प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. मोर्शी शहराच्या विविध भागांत एकूण २९ कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहेत.
काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्णांची भर पडत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात सोमवारी ४९ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यात सर्वाधिक आष्टगाव येथे १४ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याखालोखाल राजुरवाडी उपकेंद्र अंतर्गत शिरूर येथे सहा नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तालुक्यातील तरोडा, दापोरी, पाळा, पार्डी, पिंपळखुटा मोठा, भिवकुंडी, हिवरखेड, विचोरी, बोडना, चिखलसावंगी या गावांत प्रत्येकी एक एक रुग्ण आढळून आला. बोराळा या गावात दोन, तर मोर्शी शहरात विविध भागात अन्य तीन रुग्ण आढळून आले आहेत.