शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

रोहयो'च्या कामावर राबताहेत ७६ हजार मजुर; जिल्हाभरात ग्रामपंचायत,यंत्रणेकडून ६ हजार २०५ कामे

By जितेंद्र दखने | Updated: June 13, 2024 23:08 IST

अशातच सध्या पावसाळयाचे दिवस सुरू झाले असल्यामुळे शेतीचीही कामे सुरू झाली आहे. असे असतांना आजघडीला जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या ६ हजार २०५ कामावर ७६ हजार ९५१ एवढे मजूर कार्यरत आहेत.

 अमरावती : मजुरांचे स्थलांतर थांबावे या उद्देशाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच रोजगाराची उपलब्धता केली जाते. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायतींसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून ६ हजार २०५ कामे सुरू असून त्यातून ७६ हजार ९५१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

खरीप आणि रब्बी हंगाम आटोपल्यानंतर जिल्ह्यातील अनेकांच्या कामाला हात उपलब्ध होत नाही. परिणामी अनेकांच्या नशिबी कामाच्या शोधार्थ स्थलांतर येते. हे स्थलांतर थांबावे याकरिता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (रोहयो) योजनेतून पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील विविध गावांत आजघडीला घरकुल, स्वच्छतागृह, विहीर, गोठा बांधकाम या वैयक्तिक लाभाच्या कामासह शेततळे, वृक्षलागवड, बांबू लागवड साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन,सलग समतलतर अशा प्रकारची कामे जॉबकार्डधारक कामगारांच्या माध्यमातून केली जातात. यंदा उन्हाळ्यात जिल्हाभरात जवळपास ७ हजार कामांवर ८० हजारावर मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

अशातच सध्या पावसाळयाचे दिवस सुरू झाले असल्यामुळे शेतीचीही कामे सुरू झाली आहे. असे असतांना आजघडीला जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या ६ हजार २०५ कामावर ७६ हजार ९५१ एवढे मजूर कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेतंर्गत मागेल त्याला काम उपलब्ध असल्याचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अशी आहेत तालुकानिहाय कामे

तालुका -कामे - मजूर संख्याअचलपूर-७९५-२६११अमरावती-३१२-२०३०अंनजगाव सुजी-८७-५७६भातकुली-२०६-११००चांदूर रेल्वे-२३४-१९८२चांदूर बाजार -३७४-२३५४चिखलदरा-९८४-३३२५१दर्यापूर-३४१-१३०४धामणगांव रेल्वे-३१७-२२६१धारणी-५३४-११३२१मोर्शी-५८३-६७७३नांदगाव खंडेश्वर-४६२-३१७१तिवसा-४३७-३५१३वरूड-५३९-४७०४रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १३ जूनपर्यंत ६२०५ कामांवर ७६९५१ एवढ्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. रोहयोंतर्गत सध्या ग्रामीण भागातील १४ तालुक्यांमधील विविध गावांत विविध प्रकारची कामे सुरू आहेत.संजय खारकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो जि.प. अमरावती