लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा :रविवारी पहाटे पोलिसांनी यवतमाळ मार्गावरील एका ढाबा परिसरात ७६ किलो गांजा पकडला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या उपस्थितीत चार चाकी वाहनातून हा गांजा जप्त करण्यात आला. यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.लखन बिहारी शेमलकर (२५), शेख तोरण शेख बल्दार (५०, दोघेही धारणी), अब्दुल अकील अ. हफीज (३२), राजेश देवराव मेषरे (२५, दोघेही रा. खाटीकपूरा, नांदगाव खंडेश्वर) असे यातील आरोपींची नावे आहेत. रविवारी पहाटे ४ वाजता पोलिसांनी एमएच ४० के आर ७३२५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला थांबविले. त्या वाहनाच्या डिक्कीत पॅकबंद १२ बंडलात गांजा आढळून आला. त्या गांज्यासह चार चाकी वाहन असा ५ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक गोपाल भारती, पीएसआय सुदाम आसोरे, युसुफ सौदागर, विनोदसिंह चव्हाण, सचिन मोरे, पवन मारोडकर, सतीश किटुकले, राहुल वंजारी, राजेश खेलवाडे, अंकुश डहाणे, विशाल गोरले, आशिष करपे सहभागी झाले.
बडनेऱ्यात महामार्गावर पोलिसांनी पकडला ७६ किलो गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:02 IST
रविवारी पहाटे पोलिसांनी यवतमाळ मार्गावरील एका ढाबा परिसरात ७६ किलो गांजा पकडला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या उपस्थितीत चार चाकी वाहनातून हा गांजा जप्त करण्यात आला. यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
बडनेऱ्यात महामार्गावर पोलिसांनी पकडला ७६ किलो गांजा
ठळक मुद्देपहाटेची कारवाई : चार आरोपी अटकेत