शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचे ७५ हजार हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस येत असल्याने खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आलेला आहे. आतापर्यंत प्रस्तावित ६,९८,७९६ हेक्टर ...

अमरावती : जिल्ह्यात पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस येत असल्याने खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आलेला आहे. आतापर्यंत प्रस्तावित ६,९८,७९६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६,१३,६८० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ८७.८२ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक २,३८,३५२ हेक्टर सोयाबीन व २,१०,६९२ हेक्टर कपाशीचे पेरणी क्षेत्र आहे. ७५,११६२ हेक्टर क्षेत्र अद्यापही नापेर आहे.

जूनच्या ३० तारखेपासून ९ जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या होत्या, तर खरिपाची अर्धेअधिक पेरणी रखडली होती. यात किमान २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट असताना ९ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट टळले. याशिवाय पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांनादेखील गती आलेली आहे.

कृषी विभागाच्या बुधवारच्या अहवालानुसार धारणी तालुक्यात ३६,८८० हेक्टर, चिखलदरा १७,२७७, अमरावती ४८,३८२, भातकुली ३,८९४, नांदगाव खं. ६१,१७३, चांदूर रेल्वे ३९,१५७, तिवसा ३७,६९०, मोर्शी ५५,४४८, वरुड ४६,६४७, दर्यापूर ५८,९९१, अंजनगाव सुर्जी ४०,१४६, अचलपूर ३६,९८०, चांदूरबाजार ३६,९५१ व धामणगाव रेल्वे ५४,०२९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. आतापर्यंत ५,३४० हेक्टर धान, १०,९६९ हेक्टर ज्वारी, १०,६६९ मका, १,१२,३४३ तूर, १३,३८५ मूग, ४,६३३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. २० जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने यंदाच्या पेरण्या आटोपणार असल्याचे चित्र आहे.

बॉक्स

सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र

सद्यस्थितीत धारणी तालुक्यात ९,७४८ हेक्टर, चिखलदरा ६,१६६, अमरावती २६,९४५, भातकुली २५,४३५, नांदगाव ५४,६८१, चांदूर रेल्वे २३,६६१, तिवसा १६,०२५, मोर्शी १३,६०२, वरुड १,६३०, दर्यापूर १०,९५९, अंजनगाव सुर्जी १४,१६८, अचलपूर ८,०४७, चांदूरबाजार ११,७५२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २४,५३१ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे.

बॉक्स

कपाशीचीही क्षेत्रवाढ

आतापर्यंत धारणी तालुक्यात ८,५३९ हेक्टर, चिखलदरा १,८०५, अमरावती १३,६४०, भातकुली १०,२१५, नांदगाव ६,०४६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १५,७७०, मोर्शी २५,५९२, वरुड २५,९४४, दर्यापूर २५,७९९, अंजनगाव सुर्जी १४,९५२, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १५,१४६ व धामणगाव रेल्वे २१,०८७ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झालेली आहे.