शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
2
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
3
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
6
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
7
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
8
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
10
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
11
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
12
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
13
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
14
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
15
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
16
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
17
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
18
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
19
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
20
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."

जिल्ह्यात रबीची ७३ टक्के पेरणी

By admin | Updated: December 11, 2015 00:39 IST

गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

आठवड्यात २० टक्यांनी वाढ : सर्वाधिक ८४ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा अमरावती : गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. या पैकी १ लाख ८ हजार १६४ हेक्टर क्षेत्रात ९ डिसेंबर पर्यंत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ७३ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ८८ टक्केवारी आहे. चिखलदरा तालुक्यात ३ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी २ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ९१ .३४ टक्केवारी आहे. अमरावती तालुका ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ३२ टक्केवारी आहे. भातकुली तालुका १८ हजार ४८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ३२ टक्केवारी आहे. नांदगांव तालुका ६ हजार ५५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित पैकी ४ हजार ७२५हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली . ७२.१४ टक्केवारी आहे. चांदुररेल्वे तालुका ५ हजार १०३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असतांना ५ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. पेरणीची ही ९७ टक्केवारी आहे. वरुड तालुक्यात ६ हजार ९३० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ३ हजार ५३० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. ही ५०.९४ टक्केवारी आहे. दर्यापूर तालुक्यात २५ हजार ६५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १७ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. अंजनगांव सुर्जी तालुक्यात १८ हजार ७७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी ५ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. ही ३१ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात ९ हजार २५० पेरणी पार पडली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ८३ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात हरभरा व २४ हजार ३१ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.