शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

बोंडअळी नुकसानीचे ७३ कोटी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:07 IST

गतवर्षीच्या खरिपामध्ये बोंडअळीच्या संकटाने १ लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देमदतनिधीचा दुसरा हप्ता : पहिल्या हप्त्यामधील बाकी १२.१७ कोटी समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या खरिपामध्ये बोंडअळीच्या संकटाने १ लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये ६०.८६ कोटींऐवजी त्याच्या ८० टक्के म्हणजे ४८.७० कोटी शासनाने उपलब्ध केले. त्यातील बाकी १२.१७ कोटींसह दुसरा हप्ता ६०.८७ कोटी असे एकूण ७३.०४ कोटींचा निधी विभागीय आयुक्तांना प्राप्त झाला. पुढच्या आठवड्यात हा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.शासनाचे उपसचिव सु.ह. उमरानीकर यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ३३ टक्क्यांवर बाधित कपाशीचा संयुक्त स्वाक्षरीसह शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक निधीचा अहवाल मागितला. यासाठी बाधित पिकांत शेतकरी उभा असलेले ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने काढण्यात आले. यामध्ये २ लाख २१ हजार ४१५ शेतकऱ्यांच्या २ लाख २२ हजार ५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ९९ हजार १७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाले असल्याचे निष्पन्न झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे या क्षेत्रासाठी १८२ कोटी ६० लाख ३ हजार ४९३ रुपयांची मागणी शासनाकडे केली. या बाधित कपाशीसाठी हेक्टरी ३० हजार ८०० रुपयांची मदत देण्याची घोषणा तत्कालिन कृषिमंत्र्यांनी २३ डिसेंबरला नागपूर विधिमंडळात केली. प्रत्यक्षात फक्त एनडीआरएफची हेक्टरी ८,५०० रुपयांप्रमाणे मदत मिळत आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांकडून हेक्टरी १६ हजार व विम्याचे हेक्टरी आठ हजार रुपये अशी मदतीची घोषणा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणारीच ठरली आहे. कपाशी विम्यात अर्धेअधिक शेतकऱ्यांना डावलण्यात आले, तर बियाणे कंपन्याकडून मदतीचा खुद्द कृषिमंत्र्यांनाच विसर पडला आहे. एनडीआरएफचीे मदतदेखील तीन हप्त्यांमध्ये देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.मदतनिधीमधून कर्जकपात नाहीमदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निधीमधून कोणतीही कर्जकपात करता येणार नाही. लाभार्थींची यादी त्यांना वाटप निधीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यास हा निधी समान तीन हप्त्यांमध्ये देण्यात येत असला तरी शेतकºयांना अनुज्ञेय असणारी रक्कम एकाच वेळी मिळेल.बँक खाते आधारसंलग्न आवश्यकशेतकऱ्यांच्या आधारशी संलग्न खात्यांमध्ये डीबीटीने निधी प्रदान करण्यात येणार आहे. एखाद्याकडे आधार क्रमांक नसल्यास निवडणूक ओळखपत्र, आधार पावती, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पारपत्र वा बँकेच्या पुस्तिकेची खातरजमा करून प्रदान करण्यात यावी, असे ८ मेच्या शासनादेशात स्पष्ट केले.