शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ७२६० लसी ठरणार कालबाह्य; बीसीजी, कोव्हॅक्सिन, पीसीव्ही लसीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 19:41 IST

Amravati News जनतेच्या करातून शासन तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेतून लसींची खरेदी करण्यात आली. मात्र, या लसींचा योग्य वेळी वापर न करण्यात आल्यामुळे आता या लसी कालबाह्य होणार आहेत.

गणेश वासनिकअमरावती : जनतेच्या करातून शासन तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेतून लसींची खरेदी करण्यात आली. मात्र, या लसींचा योग्य वेळी वापर न करण्यात आल्यामुळे आता या लसी कालबाह्य होणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मार्चनंतर ७२६० लसी फेकण्यात येणार आहेत.

एकीकडे लसी उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत जावे लागते आणि आता वापर न झालेल्या लसी कालबाह्य ठरत असल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेचे आराेग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी २० मार्च रोजी जारी केलेल्या पत्रानुसार ३१ मार्च रोजी मुदतबाह्य होणाऱ्या विविध लसींच्या वापराबाबत आणि साठ्याबाबत तालुका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून माहिती मागविली आहे. ३१ मार्चपर्यंत वापरण्यात याव्यात, अन्यथा त्या लसी मुदतबाह्य ठरवून विल्हेवाट लावावी असे कळविले आहे. यात बीसीजी, कोव्हॅक्सिन, पीसीव्ही लसींचा समावेश असणार आहे.

आराेग्य यंत्रणेच्या माहितीनुसार बीसीजी लस ४२०, कोव्हॅक्सिन ६८२०, पीसीव्ही २० असे एकूण ७२६० एवढ्या लसी वापरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या लसी ३१ मार्चनंतर मुदतबाह्य ठरवून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. लोकांच्या पैशांच्या कसा दुरुपयोग होतो, हे दिसून येते.

टॅग्स :medicineऔषधं