शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

चार नगरपंचायतींसाठी ७२.११ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

अमरावती : जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. धारणीत ६४. ३१, भातकुलीत ७९.३०, तिवसा ६९.८३ तर नांदगाव खंडेश्वर येथे ७५ टक्के मतदान झाले. चारही नगरपंचायतींसाठी सरासरी ७२.११ टक्के मतदान झाले. भातकुलीत मतदानादरम्यान थोडा गोंधळ उडाला होता. परंतु इतर तीन ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.तिवस्यात ६९.८३ टक्के मतदानतिवसा : तिवसा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १७ प्रभागांसाठी ९१ उमेदवार रिंंगणात होते. ११ हजार ५८५ मतदारांपैकी ८ हजार ९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ४ हजार २८८ पुरुष, तर ३ हजार ९४२ महिलांचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारनंतर मतदानाचा वेग चांगलाच वाढला होता. येथे अतिशय शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. नगर पंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाल्याने युवकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. (प्रतिनिधी)धारणीत ६४.३१ टक्के मतदानधारणी : नगरपंचायत निवडणुकीत ६४.३१ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. प्रभाग क्र. ३,१०,१२,१४ येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा होती. सुरुवातीला पाचशे रुपये असलेली मतदाराची किंमत शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात होते. रोखऐवजी मागणीप्रमाणे मतदारांच्या घरापर्यंत 'भेटवस्तू' पोहोचविण्यात आल्याचीसुध्दा चर्चा होती. नांदगावात १२० उमेदवारांचे भाग्य पेटीबंदनांदगावखंंडेश्वर : येथे नगर पंचायतीच्या १७ प्रभागांसाठी शांततेत निवडणूक पार पडली. सुमारे १० हजार ७३ मतदारांपैकी ७ हजार ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७५ आहे. प्रभाग क्र. १ मध्ये एकूण मतदार ५१८ होते. त्यापैकी ४१७ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८०.५० टक्के इतकी आहे. प्रभाग क्र. २ मध्ये एकूण ७४२ पैकी ५६६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.