शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

७२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उशिरापर्यंत केंद्रांमध्ये गर्दी, थेट सरपंचांमुळे चुरस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, तर सदस्य पदांसाठी ३२९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी सकाळी १० वाजतापासून संबधित तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे.जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या ७९२ प्रभागातील १४६१ सदस्य व २४९ सरपंचपदासाठी सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान झाले. काही केंद्रांवर निर्धारित वेळेपर्यंत मतदान पूर्ण न झाल्याने मतदान केंद्रात उशिरापर्यंत मतदारांची गर्दी होती. या निवडणुकीसाठी १ लाख ६६ हजार १६५ पुरुष व १ लाख ५० हजार ८८२ स्त्री व इतर चार असे एकूण ३ लाख १७ हजार ५१ मतदार होते. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ६२ हजार ८२८ स्त्री, ७० हजार ३२८ पुरुष असे एकूण १ लाख ३३ हजार १५६ मतदारांनी मतदान केले. ही ४२ टक्केवारी होती.मतदारांचा ओघ वाढल्याने दुपारी ३.३० पर्यंत ९२,१६० स्त्री व ९७,४०७ पुरुष असे एकूण १ लाख ८९ हजार ५६७ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५९.७९ अशी होती. मतदानाची निर्धारित वेळ सायंकाळी ५.३० पर्यंत असताना केंद्रांवर मतदारांची गर्दी असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.अचलपूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानात सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचे संबधित अधिकाºयांनी सांगितले. धामणगाव रेल्वे तालुक्यात ८ ग्रामपंचायतीत झालेल्या मतदानाची टक्केवारी ८६.०३ टक्के होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ पैकी १६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ७९.०१ टक्के , दर्यापूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ८६ टक्के मतदान झाले. वरूड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी ८०.८१ टक्के, मोर्शी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७६ टक्के, तिवसा तालक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के, चांदूर बाजार तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ८१.१० टक्के, चांदूर रेल्वे तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के, अमरावती तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, भातकुली तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के , धारणी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान झाले. चिखलदरा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाची आकडेवारी मिळाली नाही.६.३० पर्यंत मतदान प्रक्रियाचांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा व घाटलाडकी येथे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ५.३० वाजता केंद्राचे दरवाजे बंद करुन मतदान झाले.