शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

सखी मंचच्या रक्तदान शिबिरात ७० महिलांचे रक्तदान

By admin | Updated: October 9, 2015 00:53 IST

येथील लोकमत सखी मंच, महिला विकास मंच, श्रध्दा शिक्षण संस्था व सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ...

उत्स्फूर्त प्रतिसाद : ३०० महिलांनी केली रक्तगट तपासणीवरुड : येथील लोकमत सखी मंच, महिला विकास मंच, श्रध्दा शिक्षण संस्था व सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी वरूड पोलीस ठाण्याच्या सभागृहात बुधवारी रक्तदान शिबिर पार पडले. स्वेच्छा रक्तदान दिवसानिमित्त महिलांनी या शिबिरात स्वयंस्फुर्तीने भाग घेतला. ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये रक्तगट आणि हिमोग्लोबीन तपासणीचा ३०० महिलांनी लाभ घेतला. रक्तासाठी उद्भवणाऱ्या समस्यांची ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी दखल घेऊन ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाची स्थापना १ जानेवारी २०१५ ला केली. याअंतर्गत त्यांनी नऊ महिन्यांत तब्बल ५९ रक्तदान शिबिरे घेऊन ३ हजार ७०० रक्तपिशव्या संकलित केल्यात. संघाच्या या कार्याची दखल अनेक सेवाभावी संस्थांनी घेतली. महिला विकासमंच, लोकमत सखीमंच, श्रध्दा शिक्षण संस्था, सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेनेसुध्दा रक्तदान चळवळीची दखल घेतली. याअंतर्गत बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्याच्या सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेऊन ७० रक्त पिशाव्या संकलित केल्यात. यामध्ये ८० टक्के महिलांनी रक्तदान केले. ३०० महिलांनी रक्तगट तसेच हिमोग्लोबीन तपासणी करवून घेतली. महिलांच्या रक्तदान शिबिरामध्ये बंदोबस्ताकरिता आलेल्या पृथ्वीराज राठोड आणि संजय राठोड या पोलिसांनीसुध्दा स्वेच्छेने रक्तदान केलेत. शिबिराकरिता नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीची चमू प्रवीण पाटील, आरोग्य कर्मचारी कल्पना वानखडे, दिव्या पौनिकर, कोमल सुतार, अनूप बिलोरकर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रक्तदाता संघाचे कोषाध्यक्ष प्रमोद पोतदार यांच्यासह वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. शिबिराकरिता लोकमत सखीमंच विभागप्रमुख रचना सोनारे, संयोगिता खासबागे, ममता भंडारी, वंदना बारस्कर, शारदा निचत, पूजा ठाकरे, अश्विनी शेंदरे, उषा ठाकरे, महिला विकासमंचच्या अध्यक्षा माया यावलकर, जया नेरकर, प्रणिता लेकुरवाळे, चंद्रलेखा केवटे, अल्का मांडवगडे, वैशाली शिंगरवाडे, आरती मांडवगडे, प्रांजली कुऱ्हाडे, दिप्ती दुर्गे, मीना बंदे, सरिता खेरडे, निशिगंधा खासबागे, आशा खासबागे, श्रध्दा शिक्षण संस्था, सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था आदींच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. केवळ महिलांकरिताच पार पडलेले हे पहिलेच रक्तदान शिबिर होय. या शिबिरात तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. (तालुका प्रतिनिधी)