शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापनदिन

By admin | Updated: August 16, 2016 23:57 IST

भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते पार पडले.

ध्वजारोहण : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते मुख्य कार्यक्रम अमरावती : भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलीस अधीक्षक लखमी गौतम उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विकासपर कामांवर प्रकाश टाकला. त्यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरले असून जिल्ह्यातील २५३ गावांमध्ये ३३७०३ टीएमसी जलसाठा निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. २५३ पैकी १२७ गावांना १०० टक्के जलयुक्त घोषित करण्यात आले. राज्य शासनाने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून अनेक योजना यशस्वीरीत्या राबवीत आहेत. त्यामध्ये पांदण रस्ते विकास योजनेतून ९८५किलोमीटर पांदण रस्ते निर्माण झालेते. लोकसहभागातून या कामासाठी ७ कोटी, रोजगार हमी योजनेतून ३२ कोटी खर्च करण्यात आले. या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेता हा अमरावती पॅटर्न राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना लोकप्रिय ठरली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात ३१५९ शेतकऱ्यांनी मागणी केली असून ३६३ शेततळे पहिल्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहेत.टेक्सटाईल पार्कमधील वस्त्रोद्योग कंपन्यामुळे जिल्ह्यात उद्योग विकासाची नांदी होत आहे. जिल्ह्याचे सुपुत्र व उत्कृष्ट संसदपटू रा.सु.गवई यांचे भव्य स्मारक लवकरच साकारणार आहे.या स्मारकाचे भूमीपूजन विद्यापीठ परिसरात नुकतेच झाले. शहरातील रस्ते व पुलाकरिता सीआरएफ फंडातून निधी उपलब्ध झाल्याचेही ते म्हणाले.पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ २ लक्ष १६ हजार शेतकऱ्यांना दिला गेला. प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज वाटप, कृषी समृद्धी महामार्ग, माझी कन्या भाग्यश्री आदी योजनांचा संक्षिप्त आढावा त्यांनी मांडला.यानंतर कृषी समृद्धी यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त शहर विभागातील शारदाचरण हरिनारायण तिवारी यांना गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती भारत सरकारद्वारे आयपीएम पदक, प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. यामध्ये पी.के.देवरणकर, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत ऋषिल हेडा, खुशबु हेडा, आयएसओअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामपंचायत चेनुष्टा व वऱ्हा येथील सरपंच व सचिव पूजा आमले, गणेश कांबळी यांचा सत्कार झाला. त्यामध्ये निकिता गौरकर, रोशनी पेठेकर, प्रियंका सराफ, अंकिता येवतकर, सोनाली धनसांडे. मौजा काटसूर, ता.तिवसा व मौजा लासूर, ता. दयार्पूर येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप काढण्याचा बचाव कार्याबद्दल तहसीलदार राम लंके व चमू व तहसीलदार राहुल तायडे व चमू यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. २८ जून रोजी तारखेडा येथील गुटखा साठा जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्याबाबत तहसीलदार सुरेश बगळे यांचा सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बोंडे, राजेन्द्र गवई, मनपा आयुक्त हेमंत पवार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)