तिवसा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी ९८ मतदान केंद्रांवर ६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ६०१ उमेदवार रिंगणात आहेत.
तालुक्यातील ठाणाठुणी ग्रामपंचायत अविरोध ठरली आहे. सात सदस्यीय ग्रामपंचयतमध्ये केवळ सात नामांकनपत्र दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील २९१ सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १५ सदस्य अविरोध झाल्यामुळे ही निवडणूक आता २७६ सदस्यांसाठी होणार आहे. निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी चालवली असून, यासाठी एकूण ४५८ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतो. असे असले तरी मतमोजणीनंतरच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार, हे मात्र निश्चित!
-----------