शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

६५ टक्के मतदार पन्नाशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:19 IST

जिल्ह्यात सद्यस्थितीत २४ लाख सहा हजार ६१९ एकूण मतदार आहेत. यामध्ये पन्नाशीच्या आतील १५ लाख ३८ हजार ९१२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा टक्का ६५.१२ इतका आहे. साठी पार केलेले चार लाख ७९ हजार २६ मतदार आहेत.

ठळक मुद्दे४,७९,०२६ साठीपार : ३१ हजार नवमतदार निर्णायक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत २४ लाख सहा हजार ६१९ एकूण मतदार आहेत. यामध्ये पन्नाशीच्या आतील १५ लाख ३८ हजार ९१२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा टक्का ६५.१२ इतका आहे. साठी पार केलेले चार लाख ७९ हजार २६ मतदार आहेत. यंदा १८ ते १९ वयोगटातील ३१ हजार ४३१ नवमतदार वाढले आहेत. यामध्ये १८ हजार ७१६ तरूण अन् १२ हजार ७१५ तरूणींचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत हे उत्साही मतदार निर्णायक ठरणार आहेत.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाद्वारा वेळोवेळी अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी प्रवेश अर्जावर मतदान जागृतीविषयक संदेश अन् वर्षभर जागृती यामुळे सहा महिन्यांत ३१ हजारांवर युवा मतदारांची नोंदणी झाली. यामध्ये मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण अधिक आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघात २६२८ मुले, तर २०३७ मुली, बडनेरा मतदारसंघात १७९५ मुले, १४१८ मुली, अमरावती मतदारसंघात २७०९ मुले व १९८३ मुली, तिवसा मतदारसंघात २२८८ मुले, १४९७ मुली, दर्यापूर मतदारसंघात २७५८ मुले व १६१३ मुली, मेळघाट मतदारसंघात २११५ मुले व १३२५ मुली, अचलपूर मतदारसंघात २३२६ मुले व १४४५ मुली तसेच मोर्शी विधानसभा मतदारसंघात २०९४ मुले व १३९४ मुली नवमतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील हे मतदार आहेत. जिल्ह्यात २० ते २९ वर्षांतील ४,३९,९४७ मतदार आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात ५३,८९३, बडनेरा ५४,१३३, अमरावती ६३,२२५, तिवसा ४९,७५२, दर्यापूर ५५,२९७, मेळघाट ६१,३२३, अचलपूर ५०,७२७ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात ५१,५९७ मतदार आहेत.४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिकजिल्ह्यात २० ते २९ या वयोगटातील चार लाख ३९ हजार ९४७ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख ३६ हजार ९१५ युवक व दोन लाख तीन हजार १८ युवतींचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख ४४ हजार ९२ मतदार ३० ते ३९ या वयोगटात आहेत. यामध्ये दोन लाख ७१ हजार ९०४ पुरूष, तर दोन लाख ७२ हजार १६७ महिला मतदारांचा समावेश आहे. ४० ते ४९ वयोगटात पाच लाख २३ हजार ४४२ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख ७१ हजार ९०४ पुरूष व दोन लाख ५२ हजार ९७५ महिला मतदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक