शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

६,३१९ कृषीपंपांना जोडणी नाही

By admin | Updated: April 20, 2017 00:12 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात.

पैसे भरुनही प्रतीक्षा कायम : शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्याची शोकांतिकाअमरावती : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात. यावर करोडोंचा खर्च होतो, मात्र या विहिरींना कृषी वीज पंपांची जोडणी व्हावी, यसाठी पैसे भरूनही जोडण्या झाल्या नसल्याची धक्कादायक बाब आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण असलेल्या जिल्ह्यात मार्च २०१७ अखेरपर्यंत सहा हजार ३१९ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांचे अर्ज प्रलंबित असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे.जिल्ह्यात सिंचनाचा टक्का वाढावा याद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न व्हावे, शेतकरी आर्थिक संपन्न होऊन शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा हा डाग पुसल्या जावा, यासाठी शासनाद्वारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धडक सिंचन विहिरींसह अनेक योजना राबविते. बँकांद्वारा विहीर खोदण्यासाठी कर्जाच्या विविध आहेत. या सर्वांच्या आधरे शेतकरी विहीर खोदतात. मात्र, या विहिरींना जर कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळालीच नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र, वीज कंपनीद्वारा शासनाने प्राधान्य दिलेल्या विषयाला साफ धुडकावून लावण्याचे चित्र आहे. मात्र २०१६ अखेर पैसे भरून अर्ज प्रलंबित असणारे सहा हजार १७ शेतकरी होते. त्यापैकी पाच हजार २६० शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर वीज जोडण्या दिल्या आहेत. वर्षभर दाखल झालेले अर्ज व वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करणारे सहा हजार ३१९ शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर पावेतो विज जोडणी मिळाली नाही. जोडणी मिळेल या आशेवर त्यांनी नियोजन केलेले उन्हाळी पिकांचे व येत्या खरीप हंगामाचे स्वप्न धुसर झाले आहे.