शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिंभोरा धरणस्थळी ६३ स्थलांतरित पक्षी

By admin | Updated: December 30, 2015 01:26 IST

मोर्शीलगतच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा प्रकल्प परिसरात ६३ पेक्षा अधिक प्रजातींचे विदेशी पक्षी आढळून आले आहेत.

‘ग्रे लॅग गुज’ची नोंद : पक्षी मित्रांचा पुढाकार, जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांवर विदेशी पाहुण्यांचे आगमनअमरावती : मोर्शीलगतच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा प्रकल्प परिसरात ६३ पेक्षा अधिक प्रजातींचे विदेशी पक्षी आढळून आले आहेत. दरवर्षी हिवाळा ऋतू सुरू होताच अमरावती जलसाठ्यावर मोठ्या संख्येने विदेशी पक्षी येण्यास सुरूवात होते.या विदेशी पक्ष्यांचा अभ्यास त्याचे निरीक्षण नोंदविण्यासाठी मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि निसर्गमित्र मंडळीच्या विद्यार्थ्यांनी सिंभोरा धरणावर कूच केले. विशेष म्हणजे ६० हून अधिक विविध प्रजातींचे मोठ्या संख्येने जलसाठ्यावर येतात. त्यातील थोडेच विदेशी पक्षी आपल्याकडील जलसाठ्यांवर १ ते ४ महिने आश्रयाला येतात. उर्वरित काहीच दिवस येथे विश्रांती घेऊन पुढल्या प्रवासाला सुरूवात करतात. या एकदिवसीय अभ्यास दौऱ्यात ६३ विविध पक्ष्यांचा नोंदी घेण्यात आल्या. यात ब्राउन हेडेड गल, पलास गल, केंटीश फ्लोवर, स्मॉल प्रिटीन्कॉल, ग्रेट पेटेंड स्राईप, सुरेशियन स्पून बिल, चेस्टनट बेलीड सॅन्ड ग्राडूज, फ्रिजंट टेल्ड जकाना, ग्रे हैरान, लिटील ग्रिब, कुली स्टॉर्क, ओपन बिलस्टार्क, ओस्प्रे, इंडियन स्किमरसह नुकताच केकतपूर तलावावर नोंदविल्या गेलेला ग्रे लॅग गुज याची पहिल्यादाच १५ पेक्षा अधिक संख्येने सिंभोरा परिसरात नोंद घेण्यात आली. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने आढळून आलेली अमरावती परिसरातील ही नोंद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. (प्रतिनिधी)बाभळीच्या खुरट्या जंगलातसिंभोरा धरणाला लागून असलेल्या बाभळीच्या खुरट्या जंगलात ब्लॅक हेडेड ओरिओल, गोल्डन ओरीआॅल, इंडियन पिट्टा, रुफस ट्रीपाय, ब्लॅक रेड स्टार्ट, आॅरेंज हेडेट थ्रश, इंडियन ग्रे हार्नविल, सरकीर मालकोश यासारख्या महत्त्वपूर्ण पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात पक्षी अभ्यासकांना यश आले आहे. विद्यार्थ्यांनी घेतला अभूतपूर्व अनुभवमोर्शी येथील भारतीय महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि निसर्गमित्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सिंभोरा धरणावर पक्ष्यांचा स्थलांतरणाचा अभूतपूर्व अनुभव घेतला. या भागात हिवाळ्याच्या दिवसांत विदेशी पक्ष्यांचे नियमित आगमण होताना आढळते.पक्षी संरक्षण,संवर्धनासाठी प्रयत्नपर्यावरणामध्ये पक्षी जीवनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. पर्यावरणाच्या सानिध्यात मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न कसे वाढविता येईल, याकरिता हा अभ्यास दौरा असल्याचे पक्षिमित्र तथा भारतीय विद्यालय, मोर्शी भूगोल विभागाप्रमुख सावन देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.