झेडपी : सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याअमरावती : जिल्हा परिषदेत वर्ग-३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या चवथ्या टप्यात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील १४ पंचायत समिती व मुख्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या एकूण ६२ प्रशासकीय व विनंती गुरूवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ३४ परिचरांच्या विनंती बदलीचा प्रस्ताव सीईओंनी काही कारणास्तव स्थगित केला आहे. त्यामुळे परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू होता.जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सर्वच विभागाच्या संबंधित बदली प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाते. त्यानुसार १२ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील विस्तार अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, आणि एका वाहनचालकाची बदली केली आहे. ही सर्व प्रक्रिया समुपदेशनाव्दारे जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात गुरूवारी अध्यक्ष सतीश उईके, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, यांच्या उपस्थित राबविण्यात आली. बदली प्रक्रियेच्या चवथ्या टप्प्यात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने विस्तार अधिकाऱ्यांची १ विनंती बदली केली आहे. याशिवाय सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या दोन प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रशासकीय दोन आणि विनंती चार, वरिष्ठ सहायक लिपिकवर्गीय प्रशासकीय ४, विनंती ६, कनिष्ठ सहायक लिपिक प्रशासकीय १० आणि विनंती ३२ तर एका वाहनचालकांची बदली करण्यात आली आहे. या प्रक्रियेत केवळ परिचर ववगळता इतर सर्व बदल्या करण्यात आली आहे.यावेळी बदली प्रक्रियेसाठी पकंज गुल्हाने, ऋषिकेश कोकाटे, लिलाधर नाल्हे, नीलेश तालन, विजय कविटकर, सुदेश तोटावार, संजय खडसे, ईश्र्वर राठोड, थोटांगे, समीर चौधरी, राजेश रोघे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले (प्रतिनिधी)परिचरांच्या बदल्या ऐनवेळी रद्दजिल्हा परिषदेच्या विविध विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गात असलेल्या जवळपास ४३ परिचर कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी प्रशासनाकडे अर्ज केले होते. मात्र एकाच वेळी एवढ्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्यास त्याच्या रिक्त जागांवर कुणाची नियुक्ती करावी, असा प्रश्न निर्माण होणार असल्याने सीईओ पाटील यांनी ही प्रक्रिया रद्द केली. या निर्णयामुळे सर्व परिचरांमध्ये नाराजी पसरली आहे.कर्मचारी युनियनचे अध्यक्ष मेळघाटातजिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी त्यांची बदली मेळघाटात करावी, अशी विनंती स्वत:हून प्रशासनाला केली होती.त्यानुसार पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या पकंज गुल्हाने यांची चिखलदरा येथे सिंचन विभागात विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.
६२ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण
By admin | Updated: May 13, 2016 00:10 IST