शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

६१ लाखांच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडली !

By admin | Updated: May 28, 2017 00:08 IST

महापालिकेत हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी फाईलवरील धूळ नव्याने झटकण्यात आली आहे.

हायड्रोलिक आॅटो खरेदीतील अनियमितता : ठाणेदारांनी मागितली माहितीप्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेत हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी फाईलवरील धूळ नव्याने झटकण्यात आली आहे. या केससंदर्भात शहर कोतवाली पोलिसांनी महापालिकेला अनुषंगिक माहिती मागविली आहे. ६० लाख ९४ हजार ९७७ रुपयांच्या या अनियमिततेप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे.महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी यांनी सन २०१५ मध्ये या अनियमिततेची तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी मनियार अ‍ॅण्ड कंपनी अहमदाबादचे उपाध्यक्ष आ.ए.मनियार व अन्य तिघांविरुध्द भादंविचे कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी बनावट व खोटे दस्तावेजाच्या आधारे तेराव्या वित्त आयोगातील अनुदानातून ६० लाख ९४ हजार ९७७ रुपयांचा आर्थिक अपव्यवहार करून २३ हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदी केले होते. गुन्हा दाखल होण्यापूर्वी लेखापरीक्षण झाले आहे का, अशी विचारणा शहर कोतवाली पोलिसांनी महापालिका यंत्रणेला केली आहे. याशिवाय स्थानिक निधी संचालनालयाचे सन २०१२ व २०१३ चे लेखापरीक्षणाबाबत माहिती मागितली आहे. हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी कार्यरत एका अधिकाऱ्यांवर निलंबनाची तलवार कोसळली होती. यावेळी हायड्रोलिक आॅटोचे दर २ लाख ५० हजार असताना अमरावती महापालिकेने मात्र २३ आॅटो प्रत्येकी ४.८९ लाख रुपयांप्रमाणे खरेदी केले होते. यात लाखोंचा अपहार झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक प्रदीप बाजड यांनी केला होता.त्यानंतर गुडेवार यांनी या प्रकरणी फौजदारीचे पाऊल उचलले होते.महापलिकेकडून असहकार्य याअगोदरही सन २०१२ व सन २०१३ च्या आॅडिटची माहिती मागितली होती.मात्र ती आतापर्यंत महापालिकेकडून प्राप्त झाली नसल्याचा ठपका शहर कोतवालीच्या निरिक्षक निलिमा आरज यांनी पाठविलेल्या पत्रातून ठेवला आहे.पुन्हा तीच माहिती मे २०१७ मध्ये मागविण्यात आली आहे.