शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्व मिळणार बोंडअळी नुकसानीचे ६१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:15 IST

गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या संकटाने एक लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यास तीन हप्त्यांमध्ये मदत : ‘एनडीआरएफ’ च्या १८२.६० कोटीस शासन मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या संकटाने एक लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. या निधीला शासनाने ८ मे रोजी मंजुरी दिली. मात्र, हा निधी जिल्ह्यास समान तीन हप्त्यामध्ये मिळणार असला तरी शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार आहे. पहिल्या हप्यात ६०.८६ कोटींचा निधी मिळणार असल्याने यंदाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत होईल.जिल्ह्यात २,२१,४१५ शेतकऱ्यांच्या २,२२,५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ९९,१७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाल्याचे निदर्शनास आले. या क्षेत्रासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२.६० कोटी तीन हजार ४९३ रूपयांची मागणी शासनाकडे केली. बाधित कपाशीसाठी हेक्टरी ३०,८०० रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी २३ डिसेंबरला नागपूर विधिमंडळात केली. प्रत्यक्षात फक्त ‘एनडीआरएफ’ची हेक्टरी ८,५०० रूपयांप्रमाणे ही मदत मिळणार आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांकडून हेक्टरी १६ हजार रूपये व विम्याचे हेक्टरी आठ हजार रूपये, अशी मदत देणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, कपाशीच्या विम्यात अर्धे अधिक शेतकºयांना डावलले, तर बियाणे कंपन्यांकडून मदतीचा खुद्द कृषिमंत्र्यांनाच विसर पडला आहे. ‘एनडीआरएफ’चीे मदतदेखील तीन समान हप्त्यात देण्यात येणार आहे.मदतनिधीतून कर्जकपात नाहीमदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या निधीमधून कर्जकपात करता येणार नाही. मदतनिधीचे वाटप झाल्यानंतर लाभार्थींची यादी त्यांना वाटप निधीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. जिल्ह्यास हा निधी एकसमान तीन हप्त्यांत देण्यात येत असला तरी शेतकºयांना अनुज्ञेय रक्कम एकाचवेळी देण्यात येणार आहे.बँक खाते आधार संलग्न आवश्यकशेतकऱ्यांच्या आधार संलग्नीत खात्यांत ही रक्कम हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रदान केली जाणार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल तर तो शेतकरी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक ओळखपत्र, आधार नोंदणी पावती, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लॉयसन्स, पारपत्र किंवा बँकेची पुस्तिकेची खातरजमा करून प्रदान करण्यात यावी, असे ८ मेच्या शासनादेशात स्पष्ट केले आहे.