शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

६०५ कोटींचे कर्जवाटप रखडले

By admin | Updated: August 1, 2016 23:56 IST

जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

शासनाला बँका जुमानेनात : २०,५२६ शेतकऱ्यांचे २५२ कोटींचे पुनर्गठन नाहीअमरावती : जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. अद्याप २४ टक्के म्हणजेच ६०५ कोटी ६ लाख रुपयांचे कर्जवाटप रखडले आहे. ३१ जुलै ही पुनर्गठनची अंतिम तारीख असताना २० हजार ५२६ शेतकऱ्यांच्या २५२ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्ज पुनर्गठन न झाल्याने ते कर्जापासून वंचित राहणार आहेत. सलग दुष्काळ, नापिकी, व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी यंदा प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे. यंदाच्या खरीप हंगामात ८० टक्के पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. यामध्ये ग्रामीण बँकांनी ८८ टक्के, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ६९ टक्के कर्जवाटप केले.परंतु शेतकऱ्यांची म्हणवविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र ५९ टक्केच कर्जवाटप केले आहे.मागीलवर्षीच्या कर्जवाटप लक्षाकांच्या तुलनेत यंदा शासनाने लक्षांकात ३१ टक्के वाढ केली आहे. जिल्हास्तरीय समन्वय समितीने एडीएलसीसीद्वारा हा लक्षांक निश्चित केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १७५९ कोटी ४६ लाख रुपयांचे खरीप पीककर्ज वाटपाचा लक्षांक दिला व ३१ जुलैच्या आत कर्जवाटपाची तंबी दिली. मात्र, मुदतीच्या आत जिल्हा बँकेने ५७१ कोटी ३३ कोटी रुपये इतके म्हणजे लक्षांकाच्या तुलनेत ४० हजार ३३७ शेतकऱ्यांना ३३६ कोटी २३ लाखाचे कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११७२ कोटी १३ लाख लक्षांकाच्या तुलनेत ८९६ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप केले तर ग्रामीण बँकांनी १६ कोटी लक्षाकांच्या तुलनेत १२ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्जवाटप जुलैअखेर केले आहे. अधिकाधिक नवीन शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामासाठी कर्जवाटप करण्याचे शासनाचे निर्देश असताना जिल्हा बँकेने केवळ २०३ शेतकऱ्यांना ९६ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.असे झाले बँकनिहाय कर्जवाटपअलाहाबाद बँकने २० कोटी ९८ लाख, आंध्रा बँक ५४ लाख, बँक आॅफ बडोदा ७ कोटी ५० लाख, बँक आॅफ इंडिया २१ कोटी १९ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र १८० कोटी ९७ लाख, कॅनरा बँक २ कोटी ४७ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १७१ कोटी ८४ लाख, कॉर्पोरेशन बँक २ कोटी ४७ लाख, देना बँक ३३ कोटी ३७ लाख, आयडीबीआय बँक ८ कोटी २३ लाख, इंडियन बँक ७ कोटी १० लाख, ओव्हरसीज बँक ४ कोटी २२ लाख, पंजाब नॅशनल बँक २ कोटी ७० लाख, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद १३ लाख, स्टेट बँक २.८२ कोटी ३८ लाख, सिंडीकेट बँक २४ लाख, युको बँक ३ कोटी ५० लाख, युनियन बँक ३२ लाख ५१ लाख व विजया बँकेने १२ लाख रूपयांचेकर्जवाटप केले आहे. (प्रतिनिधी)नाबार्डच्या ६० टक्के हिस्याला हवी शासन हमीराज्यातील ५० पैश्याच्या आत पैसेवारी असणारी १६ हजार ८०० गावे आहेत. यामध्ये ११ हजार ३५ शेतकरी पुनर्गठनास पात्र आहेत. साधारणपणे ४ हजार ४९२ कोटी कर्ज पुनर्गठनास पात्र आहे. यामध्ये २२५ कोटी असा १५ टक्के शासनाचा हिस्सा असला तरी कर्जपुनर्गठनासाठी ६० टक्के हिस्सा म्हणजे ९०० कोटी रुपयांच्या रक्कमेला शासनाची हमी आवश्यक आहे.पुनर्गठनाचे कर्जवाटपापूर्वी मुदत संपलीजिल्ह्यात यंदा ७० हजार ४९९ शेतकऱ्यांचे ६३३ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज पुनर्गठनास पात्र होते. यातुलनेत बँकांनी ६२ हजार ३९९ शेतकऱ्यांचे ५०५ कोटी ७३ लाखांचे कर्ज पुणर्गठन करण्यात आले. मात्र, ३१ जुलै या अंतिम मुदतीपुर्व ४२ हजार ४१९ शेतकऱ्यांना ३८७ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज पुनर्गइन केलेल्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. अद्याप २० हजार ५२६ शेतकऱ्यांच्या २५२.७३ कोटींचे कर्ज पुनर्गठन रखडले आहे. पुनर्गठनाच्या कर्जवाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या पदरी निराशा आली आहे.