शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन नोंदणीचे ६० हजार शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:19 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्यापर्यत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्याचे शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ केव्हा? : पाच लाख क्विंटल तूर, हरभरा घरी पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्यापर्यत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्याचे शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे.केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीच्या धोरणानुसार जिल्ह्यात १५ ते २४ मार्च या कालावधीत हरभरा खरेदीसाठी १२ केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर २९ मेपर्यंत ३३,५५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्या तुलनेत मुदतीपर्यंत १०,८०० शेतकऱ्यांची १ लाख ७६ हजार ६८३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या २२,९५५ शेतकऱ्यांचा किमान दोन लाख क्विंटल हरभरा घरी पडून आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ तूर खरेदी केंद्रांवर बुधवार १८ एप्रिलपर्यतच आॅनलाईन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. त्यानंतर आठ दिवसांनी केंद्रांना १५ मुदतवाढ दिली असली तरी खरेदीदार यंत्रणांनी निव्वळ टाईमपास केला.१५ मे रोजी शासनाने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे सद्यस्थितीत ७०,१९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात ३२,७५५ शेतकऱ्यांची ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ३७ हजार ४२२ टोकनधारक शेतकऱ्यांची किमान तीन लाख क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.केंद्रांना मुदतवाढ, चुकाऱ्याचे आश्वासन फोलजिल्ह्यात साधारणपणे आॅनलाइन नोंदणी केलेल्या ६० हजारांवर शेतकऱ्यांची तूर व हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खासगी बाजारात हमीपेक्षा कमी भावाने मागणी होत असल्याने त्यांची लूट निश्चित आहे. ते सतत आंदोलने करीत असल्यामुळे शासनाने केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन दिले. मात्र, त्यालाही दोन आठवड्यांचा कालावधी झाला असताना मुदतवाढ नाही व मागील दोन महिन्यांपासूनचे चुकारेदेखील शासनाने दिलेले नाहीत.