शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

२८ ग्रामपंचायतींत ५९.४१ टक्के मतदान, ५० जागा रिक्तच

By जितेंद्र दखने | Updated: May 18, 2023 22:47 IST

९ हजार ३५० मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क

जितेंद्र दखने, अमरावती: जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २८ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या ३१ जागांसाठी पोटनिवडणूक १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ३२ मतदान केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये ५९.४१ टक्के मतदान झाले. ९ हजार ३५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.रिंगणात असलेल्या ६४ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. या पाेटनिवडणुकीनंतरही जवळपास ३५ ग्रामपंचायतींमधील ५० जागा उमेदवारी अर्ज न आल्यामुळे रिक्तच आहेत. याशिवाय एक सरपंचपदही उमेदवारी अर्ज नसल्यामुळे रिक्त राहणार आहे.

गत डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हाभरात ७५ ग्रामपंचायतींमध्ये २ सरपंच व ११४ सदस्यांची पदे विविध कारणांमुळे रिक्त होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ३३ सदस्य अविरोध निवडून आले, तर ५० ठिकाणी अर्जच दाखल झाले नाहीत. याशिवाय दोन सरपंचपदांपैकी चांदूर बाजार तालुक्यातील सर्फापूर येथे सरपंचपदाची निवडणूक अविरोध झाली आहे. तिवसा तालुक्यातील आखतवाडा येथील थेट सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे २८ ग्रामपंचायतींमध्ये ३१ जागांकरिता ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

यामध्ये १८ मे रोजी ३२ मतदार केंद्रांवर ४ हजार ३५८ महिला व ४ हजार ९९२ पुरुष अशा एकूण ९ हजार ३५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ग्रामपंचायतींसाठी ५९.४१ टक्के एवढे मतदान झाले आहे. यामध्ये अंजनगाव बारी, पिंपरी चांदुरी (ता. अमरावती) येथे, सायत (ता. भातकुली), शेंदोळा खु. (ता. तिवसा), वाई (ता. चांदूर रेल्वे), गव्हा निपाणी, जळका पटाचे, तरोडा (ता. धामणगाव रेल्वे), अमडापूर, रोषणखेडा (ता. वरूड), सोनगाव (ता. अंजनगाव सुर्जी), शिंगणवाडी, रूस्तमपूर, लेहेगाव, शिंगणापूर, चंडिकापूर, रामतीर्थ, सासन बु. (ता. दर्यापूर), हरिसाल, कुसुमकोट बु, धूळघाट रेल्वे, सुसर्दा, मांडवा (ता. धारणी), चिचखेड, अंबापाटी, गांगरखेडा, बदनापूर, राहू (ता. चिखलदरा) या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत जिल्हा प्रशासनाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय भरारी पथकाचाही वॉच ठेवण्यात आला होता. दिव्यांग मतदारासाठी व्हीलचेअर व मतदारासाठी पिण्याचे पाणी अशा प्रकारच्या आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या होत्या.

शुक्रवारी होणार मतमोजणी

२८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवार १९ मे रोजी सकाळी १० पासून सुरू होणार आहे. भातकुली वगळता इतर सर्व ठिकाणी मतमोजणी तहसील कार्यालयात होईल. भातकुली तालुक्यातील मतमोजणी अमरावती येथील जुने भातकुली तहसील कार्यालयात होईल.

टॅग्स :Amravatiअमरावतीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक