शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५६९ मालमत्तांनाच ‘आॅक्युपन्सी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:57 IST

आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात केवळ ५६९ मालमत्ताधारकांनीच ‘आॅक्युपन्सी’ सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळविल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीर बांधकामांकडे कल : महापालिकेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात केवळ ५६९ मालमत्ताधारकांनीच ‘आॅक्युपन्सी’ सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळविल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. याचा अर्थ असा की, भोगवटा प्रमाणपत्र मिळविणाऱ्या या ५६९ मालमत्ताच अधिकृत असून, संपूर्ण शहरातील अन्य मालमत्ता अनधिकृत आहेत.सन १९८६-८७ ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ५६९ इमारतींनाच भोेगवटा प्रमाणपत्र दिल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागाने स्पष्ट केले आहे.इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती बांधकाम मानकानुसार बांधण्यात आली का, ती राहण्यायोग्य आहे की कसे, यावर संबंधित स्थानिक संस्था भोगवटा प्रमाणपत्र द्यायचे की नाही, हे ठरविते. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीत कुटुंबीयांचे वास्तव्य अनधिकृत ठरते. हे प्रमाणपत्र देताना मंजूर नकाशाप्रमाणे अन्य सर्व निकष पडताळून पाहिले जात असल्याने अनेक जण ते घेणे टाळतात. इमारतींच्या बांधकामानंतर संबंधित मालमत्ता धारकाला भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी ही संबंधित बिल्डर व विकसकांची असते.भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे नेमके काय?इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अभियंता, आरेखक यांनी विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) नुसार कलम ७.६ अंतर्गत इमारत पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) नगररचना विभागाकडे सादर करणे गरजेचे आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त होताच नगररचना विभागाकडून मंजूर नकाशानुसार इमारतीचे बांधकाम तपासले जाते. कलम ७.७ अन्वये इमारत वापरण्यासाठी योग्य असल्याचे भोगवटा प्रमाणपत्र मनपाकडून मूळ मालकाला दिल्यानंतर या इमारतीचा वापर करता येतो.