शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

५२५ तलाठी साझांची पुनर्रचना

By admin | Updated: August 27, 2014 23:12 IST

जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे

अमरावती : जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे. या पार्श्वभूमीवर तलाठी साझाची पुनर्रचना करण्याचा निर्णय महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५२५ तलाठी साझांची संख्या वाढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शासन व प्रशासन आणि सामान्य जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांची जबाबदारी पार पाडतात. आवश्यक दस्ताऐवज देणे, शेतीचे फेरफार, शेतसारा वसुली आणि अन्य प्रकारची कामे त्यांच्याकडे आहेत. नैसर्गिक, आपत्तीच्या कालावधीत सर्वेक्षण व पंचनाम्याचे कामही तलाठ्यांना दिले जाते. मात्र महसूल यंत्रणेत तलाठ्याची अपूर्ण असलेली पदे लक्षात घेऊन त्यांच्याकडे कामांचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे. या प्रकाराने प्रशासकीय कामेही रखडून पडतात. अमरावती जिल्ह्यात सहा. महसूल उपविभागात सुमारे ५२५ तलाठी कार्यरत आहेत. मात्र यापैकी १० पदे रिक्त असून काही तलाठी निलंबित आहे. त्यामुळे इतर तलाठ्यावर अतिरिक्त कामांचा भार देण्यात आला आहे. अशात नवनवीन बदल, नवीन जिल्ह्याची महसूल उपविभागाची निर्मिती होत आहे. मात्र तलाठ्यांची पदे वाढली नाहीत. वाढत्या कामाच्या व्यापामुळे जिल्ह्यासह राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी शासन दरबारी वारंवार होत आहे. मात्र तरीही यावर निर्णय होत नव्हता. अखेर ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता तलाठी साझांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात ५२५ तलाठी पदामध्ये भर पडणार असून महसूलची कामेही वेळेत होण्यास या निर्णयाची मदत होणार आहे. याबाबतचे धोरण वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या नसल्याने याला आता याचा मुहूर्त केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)