शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

५.१३ कोटी वसुलपात्र, ३० हजारांचीच वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या ...

अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या निधीचा लाभ घेतला आहे. या निधी परत घेण्यासाठी महसूल विभागाद्वारा तलाठ्यामार्फत आता या शेतकऱ्यांना निधी परत देण्यासाठी नोटीस बजावली आहे. आतापर्यंत फक्त धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या १५ हप्ताचे ३० हजार रुपये जिल्हाधिकारी कार्यालयास परत मिळाले आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे ३ लाख ३३ हजार ९११ लाभार्थी आहेत. या योजनेच्या आतापर्यंत दोन हजारांचे प्रत्येकी सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेत लाभार्थी हा खरा शेतकरीच आहे, ही खातरजमा ऑनलाईन प्रक्रियेत झाली नसल्याने आयकर भरणाऱ्या ६ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साधारणपणे ५.१३ कोटी रुपये जमा झाल्याची बाब आात उघडकीस आल्याने महसूल विभागाद्वारा ही रक्कम वसुल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक अपात्र शेतकऱ्यांच्याही खात्यात हे हप्ते जमा झाले आहेत. याशिवाय काही पात्र शेतकऱ्यांची मदत अन्य खात्यात जमा झाल्याच्याही तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणांत मृत खातेदारांच्या खात्यात निधी जमा झालेला आहे. यासाठी केंद्र शासनाने एसओपी पाठविली त्यानूसार आता निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्याच्या कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जिल्हास्तरावर दिल्या आहेत.

पॉइंटर

*पेंन्शन योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी ३,३३,९११

*शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटीस ५,७४५

* आतापर्यंत शेतकऱ्यांकडून वसूल रक्कम ३०,०००

* शेतकऱ्यांकडून वसुल करणे अद्याप बाकी ५,१३,४६,०००

बॉक्स

वसुलीची प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील १४ तालुक्यांत आयकर भरत असताना योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावणे व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत धारणी तालुक्यातील ३ शेतकऱ्यांकडून १५ हप्तांची ३० हजारांची रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. इतर तालुक्यातही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत ४० टक्क्यांवर रक्कम तालुकास्तरावर वसुल करण्यात आली असली तरी जिल्हा कायार्लयात जमा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

सातबाऱ्यावर बोजा चढविणार

आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील रक्कम वसुलीसाठी महसूल विभागाद्वारा फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस बजावल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी असहकार्य केले त्यांच्यावर आरआरसीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी न जुमानल्यास त्यांच्या सातबारावर बोजादेखील चढविला जाणार आहे. बोजा कमी करण्याच्या वेळी सर्व रक्कम वसुल केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.