संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : देशासह जगात कोरोनाने कहर केला असून, त्याचा फटका संत्र्याच्या बाजारपेठेला बसला आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या वरूडच्या मार्केट यार्डमध्ये ५०० ट्रक संत्री पडून असल्याने १७ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतातदेखील संत्री मोठ्या प्रमाणावर असल्याने गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. एकूण नुकसान हे कोट्यवधीच्या घरात जाणार असल्याची माहिती संत्रा व्यापाऱ्यांनी दिली.कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन २१ मार्चला सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत केले होते. परंतु, भीषण परिस्थिती पाहता, सरकारने कलम १४४ लागू करून जमावबंदी आदेश काढले आहेत. विदर्भाच्या कॅलिफोर्नियात मृग बहराची संत्री मोठ्या प्रमाणावर असून, दिवसागणिक ४०० ते ५०० ट्रक संत्री परप्रांतात जातात. परंतु, कोरानाविरुद्ध देशपातळीवर युद्ध सुरू असल्याने बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड, केरळ, बांग्लादेश, मुंबईला जाणारे ट्रक थांबले आहेत. तोडाईचे शेवटचे दिवस असल्याने व्यापाºयांनी खरेदी केलेली संत्री तोडणे आवश्यक आहे. तोडाई बंद केली, तर शेतात संत्र्याची गळती वाढली आहे. वरूड येथे ५२ संत्रा मंड्या आहेत. यामधील मजुरांनी रात्री ९ वाजता संचारबंदी संपताच घाईघाईत संत्र्याचे पॅकिंग सुरू केले. मात्र, राज्यात १४४ कलम लागू करून जमावबंदी आदेश निघाल्याने ५०० ट्रक अडकले. संत्र्याला १७ ते २५ रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. एका टनाला १७ ते २५ हजार रुपये भाव मिळत असला तरी कोरोनामुळे मालमोटारीची चाके थांबली आहे. परप्रांतातसुद्धा संत्री विकली जात नसल्याने व्यापाºयांचे अंदाजे १७ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यापेक्षाही अधिक संत्री शेतातील झाडांवरच असल्याने तोडाई आणि भराईचा प्रश्न कायम आहे. त्याला गळती लागत आहे. शेतकऱ्यांच्या बागेचा सौदादेखील प्रलंबित आहे. कोरानामुळे अशाप्रकारे पून्हा शेतकऱ्यांवर कर्ज वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शासनाने संत्री खरेदी करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे. कोट्यवधीच्या नुकसानाला संत्रा उत्पादकांसह व्यापाºयांनाही बळी पडावे लागण्याची शक्यता आहे.१०० कोटींचे नुकसानकोरोनामुळे आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. यामुळे ट्रक राज्याबाहेर निघू शकत नाहीत. बाजारपेठेत मध्ये ५०० ट्रक संत्री पडून आहेत, तर १० ते १५ टक्के संत्री झाडावरच असल्याने व्यापाऱ्यांपुढे पेच पडला आहे. शेतकºयांना रक्कम देणे बाकी आहे, तर काहींना दिली तरी संत्री शेतातून बाहेर काढता आलेली नाहीत. या अवस्थेत भाव चांगले असताना, गाड्या परप्रांतीय बाजारात पोहोचत नसल्याने वरूड तालुक्याला १०० कोटी रुपयांचा फटका संत्रा व्यापाºयांसह शेतकºयांना पडणार असल्याने आम्ही चिंताग्रस्त आहोत; आर्थिक ताण वाढला असल्याचे वरूड येथील संत्रा व्यापारी उत्तम आलोडे यांनी सांगितले.संत्री पोहोचणार तरी कशी ?संत्र्याला मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आले होते. २२ ते २५ हजार रुपये टनाप्रमाणे विकला जात होता. परंतु, अचानक कोरोनामुळे सर्व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने वाहतूक थांबली, तर झारखंड, दिल्ली, बांग्लादेश सीमा सील झाली. आता मुख्य बाजारपेठेत संत्रा पोहोचू शकत नाही. २२ मार्चला संत्री घेऊन निघालेली ५०० वाहने मध्येच अडकून पडल्याने काय करावे, हा प्रश्न आहे. शेतातही मोठ्या प्रमाणात संत्री तोडून पडली, तर मंडीतही हजारो टन संत्री पडून आहेत. यामध्ये शेतकºयांसह संत्रा व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. अपरिमीत नुकसान सहन करण्याची वेळ आली असल्याचे ताज फ्रुट कंपनीचे संचालक ताजूभाई यांनी सागितले.
वरुड येथील मंडीत ५०० ट्रक संत्री पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन २१ मार्चला सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत केले होते. परंतु, भीषण परिस्थिती पाहता, सरकारने कलम १४४ लागू करून जमावबंदी आदेश काढले आहेत. विदर्भाच्या कॅलिफोर्नियात मृग बहराची संत्री मोठ्या प्रमाणावर असून, दिवसागणिक ४०० ते ५०० ट्रक संत्री परप्रांतात जातात.
वरुड येथील मंडीत ५०० ट्रक संत्री पडून
ठळक मुद्दे१७ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान : बागेतील संत्र्याची पडझड