शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ५० हजार दुचाकी रस्त्यावर

By admin | Updated: May 26, 2017 01:33 IST

जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाख आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर झालेली वाहनांची गर्दी लक्ष वेधून घेणारी आहे.

‘आरटीओ’ची आकडेवारी : एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत नोंदणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याची लोकसंख्या २९ लाख आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर झालेली वाहनांची गर्दी लक्ष वेधून घेणारी आहे. वाहनांची वाढती संख्या ल्क्षात घेता पार्किंगचा मात्र पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ५० हजार दुचाकींची नोंदणी होऊन त्या रस्त्यावर आल्या आहेत. वर्षानुवर्षे चारचाकी आणि दुचाकींच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषण पातळीचा आलेख वाढतच चालला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांच्या नोंदीनुसार यंदा ३२१६५ मोटरसायकल, ९२१२ स्कुटर्स, २७१ मोपडची नोंदणी करण्यात आली. मोटर कार ३६८२, जीप गाडी १३७, ट्रॅक्टर्स ६०, स्टेज कॅरेज वाहन २५, आॅटोरिक्षा ५०३, मिनीबस २७, स्कूल बस १३१, अ‍ॅम्बुलन्स ११, ट्रक आणि लॉरिज २०९, टँकर १, व्हॅन ५२०, व्हॅन थ्री व्हिलर २७१, ट्रॅक्टर्स ७९६, ट्रेलर्स ३७३ तर अन्य ४१ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागिल काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेता दरवर्षी वाहन नोंदणीत वाढ होत आहे. रस्त्यावरील दुचाकी व चारचाकीच्या गर्दीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात. फफ्फुसाचे रोग, श्वसनाचे आजार, रक्तदाबाने बाधित रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कार्बनडाय आॅक्साईड, मोनॉक्साईडचे प्रदूषण वाढत असल्याचा अहवाल प्रदूषण विभागाने शासनाकडे सादर केल्याची माहिती एका डॉक्टरने दिली..दुचाकींची महिनानिहाय नोंदणी १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षभरात ५० हजार दुचाकी रस्त्यावर आल्यात आहेत. तत्पूर्वी या दुचाकींची रितसर नोंदणी आरटीओमध्ये करण्यात आली आहे. एप्रिल२०१६ मध्ये- ३८०२, मे- २९०५, जून २९०५, जून-३१८२, जुलै-३६३९, आॅगस्ट- ३०३९, सप्टेंबर- ३५१३, आॅक्टोंबर- ५४७१, नोव्हेंबर- ४३१३, डिसेंबर-१९९७ तर जानेवारी २०१७ मध्ये-३९२, फेब्रुवारी-३०१, मार्च-४७४ मध्ये दुचाकींची नोदणी करण्यात आली आहे.अन्य वाहनांच्या तुलनेत दुचाकींची सर्वाधिक नोंदणी झाली आहे.. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे. तरुणाईचा कल दुचाकीकडे असल्याचे नोंदणीवरुन दिसून येते.- विजय काठोडेप्रादेशिक परिवहन अधिकारी