शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या जागेसाठी ५० हजारांची मदत

By admin | Updated: January 25, 2016 00:21 IST

शासकीय योजनांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकूल दिले जाते. मात्र स्वत:ची जागा नसल्यास घरकूल मिळण्यास अडचण निर्माण होते.

अनुदान : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना योजनेतून लाभअमरावती : शासकीय योजनांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकूल दिले जाते. मात्र स्वत:ची जागा नसल्यास घरकूल मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून आता घरकुलाच्या जागेसाठीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वत:ची जागा नाही अशा कुटुंबाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात योजनेस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत आहे. यामध्ये केंद्र व राज्याचा वाटा ५० टक्के आहे. केवळ जागेअभावी लाभार्थी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये हा शासनाचा उद्देश आहे. ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास व शबरी आवास योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकूलपात्र परंतु जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहणार आहे. भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी १० हजार रूपये आणि या योजनेंतर्गत ४० हजार रूपये अशाप्रकारे ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत ५०० चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मोठ्या ग्रामपंचायती व शहराशेजारील ग्रामपंचायतींमध्ये जागेचे अधिक दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता ५०० चौरस फुटांपर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दुमजली, तीन मजली इमारत बांधण्यासाठी लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)असे आहेत जागेसाठीचे नियमयोजनेसाठी ग्रामपंचायतींतर्गत गावठाण हद्दीतील व हद्दीबाहेरील सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली अकृषक जागा, लाभार्थ्याने सहमती दिलेली जागा असावी, लाभार्थ्याला जागा मालकाबरोबर विक्री करार करावा लागणार आहे. जागेची खरेदी करताना समिती समन्वय ठेवणार आहे. जागेचा देय निधी लाभार्थ्याच्या बँक, पोस्ट खात्यावर जमा करण्यास समिती मान्यता देईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. जागेचा देय निधी लाभार्थ्याच्या बँक, पोस्ट खात्यावर जमा करण्यास समिती मान्यता देईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. खरेदीनंतर जागेची नोंद ग्रामपंचायतीकडे समितीमार्फत करण्यात येईल. जागेची नोंद प्राधान्याने लाभधारकांच्या परतीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येणार आहे.