शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार पशुधन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:26 IST

मोहन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : वाढत्या थंडीमुळे शेळ्या, गार्इंसह इतर जनावरे विविध आजाराने ग्रस्त असताना धामणगाव ...

ठळक मुद्देडॉक्टरविना दवाखाना आठ दिवसांपासून बंद : पशुधन विकास अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वाढत्या थंडीमुळे शेळ्या, गार्इंसह इतर जनावरे विविध आजाराने ग्रस्त असताना धामणगाव शहरातील सर्वात मोठा असलेला पशुवैद्यकीय दवाखाना मागील आठ दिवसांपासून अधिकाऱ्यांअभावी बंद आहे. दरम्यान, तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे पन्नास हजारांवर पशुधन धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.धामणगाव तालुक्यातील राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सर्वात मोठ्या शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी ओस पडला आहे. येथे नियुक्त असलेले पशुधन विकास अधिकारी तेलंग यांना सोयीचे म्हणून अमरावती येथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले, तर धारणी येथील एका महिला अधिकाºयाची प्रतिनियुक्ती धामणगावातील दवाखान्यात करण्यात आली होती. मात्र, त्या प्रसूती रजेवर असल्याने येथील पशुवैद्यकीय दवाखाना आठ दिवसापासून बंद आहे. शेंदूरजना खुर्द येथे अनेक दिवसांपासून परिचराचे पद रिक्त आहे. हीच अवस्था हिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची आहे. जिल्हा परिषद अंतर्गत तळेगाव दशासर येथील दवाखान्यात चार महिन्यांपूर्वी बदली झालेले पशुधन विकास अधिकारी रुजू होण्यास तयार नाहीत. मंगरूळ दस्तगीर येथील पशुधन विकास अधिकारी व परिचराचे पद रिक्त आहे.औषधांचा तुटवडासध्या थंडीचे दिवस असल्याने शेळ्यांना सर्दी व हगवण या आजाराने ग्रासले आहे. मात्र, तालुक्यात या दोन्ही आजारावर औषध उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी पोषक टॉनिक नाही. एखादा पशू जखमी झाल्यास अँटिसेप्टिक मलम नाही. तोंडखुरीकरिता लसीकरण करण्यात येते; मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हे लसीकरण कितपत पूर्ण केले जाते, असाही प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.विरूळ रोंघेचा प्रस्ताव धूळखातधामणगाव ते चांदूर रेल्वे अशा २१ किलोमीटरच्या अंतरात एकही पशुवैद्यकीय दवाखाना नाही. या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या विरुळ रोंघे येथे पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा म्हणून दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पाच हजार पशुधन घटक असलेल्या परिसरात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील शेतकऱ्यांना आपली जनावरे उपचारासाठी चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे अशा तालुक्याच्या ठिकाणी आणावे लागतात.कधी मिळणार पशुधन विकास अधिकारी?धामणगाव पंचायत समिती निर्मितीच्या वेळी आकृतिबंधात पशुधन विकास अधिकारी या पदाला मंजुरी देण्यात आली नाही. तेव्हापासून हे पद नसल्याने अनेक योजना पशुसंवर्धन विभागाला राबविता आलेल्या नाहीत. मंत्रालयातून हे पद आकृतिबंधात मंजूर करण्यासाठी आतापर्यंत कोणताच प्रयत्न झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाच्या अनेक योजनांचा डोलारा प्रभारी अधिकाºयाला सांभाळावा लागत आहेधामणगाव तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त आहे प्रतिनियुक्तीवर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.- विजय रहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती