शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या अनुदानात ५० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:31 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५० टक्के कपात लागू झाल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शिक्षकांपुढे उभा झाला आहे. पहिली ते आठवीच्या शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत हे अनुदान लागू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांपुढे पेच : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा चालवायच्या कशा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५० टक्के कपात लागू झाल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शिक्षकांपुढे उभा झाला आहे. पहिली ते आठवीच्या शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत हे अनुदान लागू करण्यात आले आहे.शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी प्रतिशिक्षक पाचशे रुपये शाळेला लागणाऱ्या स्टेशनरीसह विज देयकासाठी प्राथमिक शाळांना ५ हजार व उच्च प्राथमिक शाळांना १२ हजार रुपये, देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिशिक्षक ५ ते १० हजार रुपये अनुदान प्राप्त होत असे. उच्च प्राथमिक शाळेत ८ खोल्या मुख्याध्यापकांसह ८ शिक्षक व दोनशेपर्यंत विद्यार्थी असल्यास १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असे. पण, आता शंभर पटसंख्येस १० हजार रुपये, २५० च्या पटसंख्येतील शाळांना १५ हजार रुपये, ५०० पटसंख्या असल्यास २० हजार रुपये व एक हजार पटसंख्या असल्यास २५ हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने ठरविले आहे. या अनुदानातून स्वच्छ पेयजल, स्वच्छतागृहांची व्यवस्था प्रशासकीय कामकाज शैक्षणिक व सहशालेय उपक्रम देखभाल व दुरुस्ती संगणक आदी उपकरणांची दुरुस्ती व वीज देयकांचा भरणा करणे अपेक्षित आहे. मंजूर अनुदानातून खर्च भागवणार कसा, हा प्रश्न मुख्याध्यापकांना सतावत आहे.काही उपक्रमात शासनाने लोकवर्गणीचा पर्याय दिला. पण ग्रामीण भागात वर्गणी देण्याची नागरिकांची ऐपत नसते. उलट मुलांचा खर्च शिक्षकांना भागवावा लागतो. चार वर्षांपासून अशा शाळांच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेचेंस मिळालेले नाहीत. दुरुस्तीसाठी निधी नाही.शालेय पोषण आहारांतर्गत मिळणाºया पट्या किंवा आसनपट्ट्यांचा पुरवठा बंद आहे. वीज कंपनीचे सेमी वाणिज्य दराने शाळांना वीजपुरवठा करते. शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे संगणक संच स्मार्ट बोर्ड तसेच वॉटर कूलर, दिवे अशा बाबींसाठी विजेचा वापर अपरिहार्य ठरतो. १५० ते २०० पटसंख्या असणाऱ्या शाळांना महिन्याकाठी किमान ११०० रुपये, तर वर्षाला १३ हजार रुपये वीज देयकांसाठी खर्च करावा लागतो.आतापर्यंत सर्वशिक्षा अभियानातून अनुदान देताना पटसंख्येची अट नव्हती. परंतु, आता समग्रमध्ये शाळांना अनुदान देताना पटसंख्येची अट लागू केली. ही अट न टाकता व अनुदान कपात न करता शाळांसाठी वाढीव अनुदान शासनाने द्यावे- राजेश सावरकर,राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती