शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० टक्के कपात

By admin | Updated: November 13, 2016 00:09 IST

अग्रीमाचे समायोजन टाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ती रक्कम वसूल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

एमएमसीचे निर्देश : अग्रीमाच्या समायोजनात गौडबंगालअमरावती : अग्रीमाचे समायोजन टाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ती रक्कम वसूल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील ५० पेक्षा अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून ५० टक्केच वेतन मिळणार आहे. अग्रीमाचे रक्कम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही ५० टक्के कपात केली जाणार आहे. महापालिकेतील बहुतांश अधिकारी-कर्मचारी वेळेवरच्या खर्चासाठी काही रक्कम आगाऊ घेतात. तो कार्यक्रम किंवा अन्य कार्य पूर्ण केल्यानंतर या आगाऊ घेतलेल्या रकमेचा हिशेब देऊन ती रक्कम परत करणे अनिवार्य असते. मात्र महापालिकेतील ४० पेक्षा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८७ लाख रुपयांचे अग्रीम रकमेचे समायोजन केले नाही. यावर २०११-१२ लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आलेत. अतिरिक्त आयुक्तांचे लेखा विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी लेखा आक्षेपातील अग्रीम व वसुली पात्र रकमा वसूल करण्यासाठी मुख्य लेखाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्यानंतरही अग्रीमाचे समायोजन झालेले नाही. वसुलीपात्र रकमाही रखडल्या आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्तांनी मुख्यलेखाधिकाऱ्यांना पत्र लिहून अग्रीमाबाबत आठवण करून दिली आहे. महापालिकेच्या कुठल्या खातेप्रमुख किंवा विभागप्रमुखांकडे किंवा त्यांच्या अधिनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कोणकोणत्या वर्षाच्या लेखापरीक्षणातील अग्रीम व वसुलीपात्र रकमा अद्याप वसूल होणे बाकी आहे, याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी मागितली आहे. (प्रतिनिधी)रक्कम वसुली होईस्तोवर कारवाई सुरूचज्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आॅक्टोबर २०१६ पर्यंत वसुलीपात्र रकमांची वसुली अद्याप पूर्ण झाली नसेल तर अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०१६ पासून निव्वळ देय असणाऱ्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम वसूल करावी, ही कारवाई वसुली होईपर्यंत सुरू ठेवावी, अशा सूचना शेटे यांनी मुख्यलेखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रकमांचा तपशील आयुक्तांकडे सादर करावापुरवठादार व कंत्राटदारांच्या देयकांतून लेखा आक्षेपातील वसुलीपात्र रकमा वसूल कराव्यात. त्याशिवाय देयक तपासणी करून प्रदान करू नयेत. तसेच कर्मचारी, अधिकारी व पुरवठादार - कंत्राटदारांकडून वसूल होणाऱ्या अग्रीम व वसुलीपात्र रकमांचा तपशील आयुक्तांकडे व आपल्याकडे दरमहा सादर करावा, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिल्यात.