शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाचा ५० लाखांचा निधी पडून

By admin | Updated: June 1, 2015 00:32 IST

शासनस्तरावर निधी विनियोगाच्या कृती आराखड्यास मंजुरी दिली नसल्याने आपत्ती व्यवस्थानाचा सन २०१३-१४ चा...

२०१३-१४ चा निधी : विनियोगाच्या कृती आराखड्यास मंजुरी नाहीअमरावती : शासनस्तरावर निधी विनियोगाच्या कृती आराखड्यास मंजुरी दिली नसल्याने आपत्ती व्यवस्थानाचा सन २०१३-१४ चा ५० लाख रुपयांचा निधी वर्षभरापासून पडून आहे. शोध, बचाव पथकात पुरेशा साहित्याचा अभाव असताना शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या २२ जानेवारी २०१४ च्या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक ५० लक्ष निधीचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचा कृती आराखडा सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी विनियोगाचा कृती आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला. मात्र, महसूल विभागाने या कृती आराखड्यास मंजुरी दिली नसल्याने हा ५० लाखांचा निधी अद्याप अखर्चिक आहे. वास्तविक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनांंतर्गत शोध, बचाव पथकात साहित्याचा अभाव आहे. खर्च करावयाचा निधी महसूल विभागाच्या बेपर्वा धोरणामुळे पडून आहे. दोन महिन्यांसाठीच आपत्ती व्यवस्थापन अधिकारीजिल्हा आपत्तीप्रवण आहे. आपत्ती कधीही सांगून येत नाही. तरीही जिल्हाधिकारी व विभागीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वय अधिकाऱ्यांना १६ एप्रिल ते १५ जून २०१५ या दोन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. प्रत्यक्षात यानंतरच मान्सून सक्रिय होतो. खऱ्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी यानंतरच्या काळात असते. मात्र, शासनाच्या तुघलकी निर्णयामुळे यावर्षी आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजणार, असे दिसून येते. अखर्चिक निधीविषयी अधिकारीच अनभिज्ञपावसाळा तोंडावर असल्याने प्रशासनसमोर आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा व प्राध्यान्याचा विषय असायला हवा. किंबहुना शुक्रवारी आपत्ती व्यवस्थानाविषयी राज्याची बैठक मुंबईला झाली आहे. जिल्ह्यात ५० लाखांचा निधी खितपत पडला आहे. याविषयी संपर्क साधला असता निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांनी पाहून सांगतो, असे सांगितले.