शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

रबीसाठी साडेपाच कोटींचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला.

मार्चअखेर होणार बँक खात्यात जमा : गव्हाला ९, हरभऱ्याला १० तालुक्यात ठेंगा अमरावती : रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. मार्च अखेरपावेतो बँकांद्वारा विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वत्रिक नुकसान झाले. मात्र भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व दर्यापूर तालुक्यात हरभऱ्यासाठी विमा मिळणार आहे. उर्वरित १० तालुक्यांना ठेंगा दाखविला आहे. गव्हासाठी अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व वरूड तालुक्यातच विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित ९ तालुक्यांना डावलले गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. रबीत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभरासाठी ६४ महसूल मंडळात ही योजना होती. यात हरभरा पिकासाठी अचलपूर तालुक्यात १६०, अंजनगाव ७०२, भातकुली २१०५, चांदूरबाजार ३३८, चिखलदरा १०९, दर्यापूर ७९४९, धामणगाव २४०, धारणी १, मोर्शी ३९ व वरूड तालुक्यात १५९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हासाठी अचलपूर तालुक्यात २८, अमरावती ३३९, अंजनगाव सुर्जी ४५, भातकुली ७०, चांदूरबाजार ५०, चांदूररेल्वे ३७०, चिखलदरा १३७, धामणगाव ३२६, मोर्शी ४०, नांदगाव खंडेश्वर १६१७, तिवसा ३५५ व वरूड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हाला १० लाखांची विमा भरपाई भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना ५८ हेक्टरसाठी एक लाख ४५ हजार १५७, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना ३९ हेक्टर क्षेत्रासाठी २८ हजार ४५४, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना ४० हेक्टरसाठी एक लाख २२ हजार ३०७, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना १२० हेक्टरसाठी ६ लाख ६१ हजार ९२१ व वरुड तालुक्यात १३० शेतकऱ्यांना २२० हेक्टरसाठी एक लाख १६ हजार १५५ रुपये असा एकूण १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. कांदा, उन्हाळी भूईमूग निरंकउन्हाळी भूईमुगासाठी अंजनगाव सुर्जी व तिवसा तसेच कांद्यासाठी अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला होता. मात्र या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला विमा मंजूर झालेला नाही. विम्यात कंपनीद्वारा फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.