शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

498 पुन्हा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोना संसर्गाचा रोज नवा धमाका जिल्ह्यात सुरू आहे.   कोरोनाकाळातील ११ महिन्यांतील सर्वाधिक ४९८ ...

ठळक मुद्देतीन दिवसांत १,४३०, फेब्रुवारीच्या १७ दिवसांत ४,७४७ कोरोनाग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गाचा रोज नवा धमाका जिल्ह्यात सुरू आहे.   कोरोनाकाळातील ११ महिन्यांतील सर्वाधिक ४९८ पॉझिटिव्हचा हादरा बुधवारी बसल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २६,७२६ झाली आहे. २४ तासांत उपचारादरम्यान सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ४४८ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १७ दिवसांत ४,७४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सलग तीन दिवसांत ४४९, ४८५ व ४९८ असे एकूण १४३० संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धमाका झालेला आहे.‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत शासनाने सर्व क्षेत्रांत मोकळीक दिल्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढीस लागला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सध्या वाट लागली आहे. त्याचे पालन करविताना जिल्हा प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने केंद्र शासनाचे तीन सदस्यीय पथकाने जिल्ह्यास भेट देऊन सूचना केल्या होत्या तसेच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना जिल्हास्थिती अवगत केली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी पुन्हा माजी आरोग्य संचालक तथा जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे डॉ. साळुंके व अन्य एक सल्लागार यांनी जिल्ह्यास भेट दिली. त्यांनी प्रथम सुपर स्पेशालिटीमध्ये बैठक घेतली व नंतर एक्झॉन हॉस्पिटल व आयसोलेशन दवाखान्याला भेट दिली. सायंकाळी जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसोबत संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. 

- तर हॉटेल, बारला २५ हजार दंड, १० दिवस सीलहॉटेल, बार, रेस्टॉरेंटमध्ये क्षमतेच्या ५० टक्क्यांवर व्यक्ती आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन नसल्यास २५ हजारांचा दंड आकारून १० दिवसांकरिता प्रतिष्ठान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले.

५० पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास मंगल कार्यालयास ५० हजारांचा दंडजिल्ह्यातील मंगल कार्यालये, लॉन, हॉल , सभागृहांमध्ये आयोजित लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास  संबंधित मंगल कार्यालय चालक, मालक, व्यवस्थापकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन ५० हजारांचा दंड आकारणी करण्यात येईल. पुढील १० दिवसांसाठी मंगल कार्यालय सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या