कॉमन
(लोकमत बातमीचे कात्रण घेणे)
अमरावती : राज्याच्या महसूल व विभागाने वनपाल (गट -क) या संवर्गातील ४९ कमर्चाऱ्यांना वनक्षेत्रपाल गट -ब (राजपत्रित) या पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून पदोन्नती दिली आहे. त्याअनुषंगाने ११ मे रोजी शासनादेश जारी केला असून, क्षेत्रील वन अधिकाऱ्यांची वाणवा या माध्यमातून दूर करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या नवनियुक्त आरएफओंना रिक्त जागांवर रूजू हाेण्याचे आदेश आहेत.
‘लोकमत’ने ११ मे राेजी ‘ राज्यात क्षेत्रीय वन अधिकाऱ्यांची २०० पदे रिक्त’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा लोकदरबारात मांडला होता. या वृत्ताची दखल घेत महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी अ.का. लक्कस यांनी ११ मे २०२१ रोजी शासनादेश निर्गमित करुन वनपालांच्या रखडलेल्या पदोन्नती तत्काळ आरएफओ म्हणून बहाल केली. किंबहुना पदोन्नती दिलेल्या रिक्त जागांवर रूजू होण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. वनपाल असलेल्या ४९ कर्मचाऱ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. यात सतिश मुचलवार (नागपूर्), सचिन नवरे( अमरावती), रवींद धोटे(नागपूर), राकेश मडावी (नागपूर), संगिता ढोबाळे (नागपूर), दिलीप कौशिक (नागपूर), वर्षा नागरगोजे (औरंगाबाद), अश्र्विनी शिंदे (पुणे), मनीषा धांदे (नागपूर), मीनल तुरखडे (नागपूर), गणेश पचलोरे (औरंगाबाद), हरिदास शेंडे ( नागपूर),राजश्री बागंर (औरंगाबाद), विजय तेलंग (नागपूर), शिल्पा गिते (औरंगाबाद (औरंगाबाद) ज्ञानेश्र्वर गजबे (नागपूर), आनंद पाटील (नाशिक), विठ्ठल पवार (नाशिक), प्रभाकर वानखडे (अमरावती),भारती राऊत (नागपूर), प्रमोद पाझारे (नागपूर), पवन बावनेर (अमरावती), आरती मडावी (नागपूर), उद्धव नेताम (नागपूर), चैतन्य कांबळे (पुणे), नंदकुमार केळवतकर (नागपूर), प्रतिभा सोनवणे (नाशिक), सुनील राठोड (अमरावती), अरूणा चौधरी ( नागपूर), मदन लोखंडे (अमरावती), उत्तम विकटे (औरंगाबाद), भाईदास थोरात (नाशिक), राजश्री साळवे (नाशिक), श्रीनिवास कटकु (नागपूर) राजू जयपूरकर (औरंगाबाद), ललित गेडाम (कोकण -१), वैशाली भलावी (नाशिक), साहेबराव चक्रे (अमरावती), राजश्री किर (कोकण -१), विवेक येवतकर (अमरावती), धनंजय पोटे (औरंगाबाद), स्मिता होगाडे (पुणे), सचिन सिडतुरे (औरंगाबाद), दिपेश लोखंडे (अमरावती), पुष्पा डोंगरे (अमरावती), रवींद्र खेरडे (कोकण -१), राजेंद्र घुणकीकर (कोकण -१) यांचा समावेश आहे. वनपरिक्षे अधिकारी पद हे वन विभागात क्षेत्रीय पद मानले जाते. जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची धुरा आरएफओ हाताळतात. राज्यात ८५ पदे आरएफओंची रिक्त होती. आता वनपालांच्या पदोन्नतीमुळे ४९ रिक्त जागांवर नवनियुक्त आरएफओ हे धुरा सांभाळती, हे वास्तव आहे.
---------------
सहायक वनसंरक्षकांची पदोन्नती केव्हा?
वन विभागात क्षेत्रीय वन अधिकारी म्हणून सहायक वनसंरक्षक हे पद फार महत्वाचे आहे. राज्यात सहायक वनसंरक्षकांची ५५ पदे रिक्त आहेत. अनेक आरएफओंना एसीएफ़ पदावर पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. तसेच विभागीय वन अधिकाऱ्यांची ३५ पदे रिक्त आहे. परंतु, सहायक वनसंरक्षकांची पदोन्नती केव्हा करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. वन विभागाच्या पदोन्नती समितीने (डीपीसी) आठ महिन्यापूर्वी पदाेन्नतीचा निर्णय घेतल्यानंतरही आदेश जारी करण्यात आले नाही. राज्याचा वन विभाग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना सुद्धा कासवगतीने कारभार सुरू असल्याचे चित्र आहे.
००००००००००००००००००००००