शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४८६ दुर्गा, ७४ शारदा देवींची स्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:15 IST

अश्विन शुद्ध प्रतिपदा १ आक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला विधीवत पूजा करून सुरुवात झाली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त : ३१ सार्वजनिक मंडळे संवेदनशील अमरावती : अश्विन शुद्ध प्रतिपदा १ आक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला विधीवत पूजा करून सुरुवात झाली. आता दहा दिवस भाविकांचा उत्साहाला उधाण येणार आहे. यंदा शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ४८६ दुर्गा व ७४ शारदा देवींची स्थापन होणार आहे. यादरम्यान शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. शहरातील ३१ संवेदनशील सार्वजनिक मंडळांकडे पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात शहरातील वातावरण भक्तीमय होते. नऊ दिवस शहर रोषनाईने लखलखून जाते. अंबा व एकविरा देवीच्या दर्शनासाठी लक्षावधी भाविक येतात. त्यामुळे दिवसरात्र शहरातील बाजारपेठ सजली असते. यंदा ४८६ दुर्गा मंडळांच्या नोंदी पोलीस विभागाकडे असून भव्य मिरवणूक काढून दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. बाजारपेठेत फुले, साज श्रृंगार, खाद्यपदार्थांसह विविध वस्तु विक्रीसाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. या उत्सवादरम्यान काही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याकरिता ४ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ९० सहायक पोलीस निरीक्षक व पीएसआय, २३० पोलीस कर्मचारी, ११९ महिला पोलीस, ३५० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, ४०० पोलीस मित्र, यांसह १ कंपनी असा तडगा बंदोबस्त लावण्यात आला आहे. (प्रतिनिधी)संवेदनशील चौकांवर लक्षनवरात्रौत्सव साजरा करताना शहरातील काही ठिकाणी अप्रीय घटना घडल्या आहेत. अशा ३१ संवेदनशील चौकांकडे यंदा पोलीस विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. त्या चौकांमध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. ध्वनीप्रदूषणावर होणार कारवाईदरवर्षी शहरात नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळते. या उत्सवादरम्यान ढोल ताश्यासह डिजेच्या माध्यमातून उत्साह दाखविला जाते. यादरम्यान ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करणार आहे. त्याकरिता पोलीस विभागाकडून विविध ठिकाणी पाच पथके तयार करण्यात आली असून ते ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणार आहेत.