सतर्कतेचा इशारा : कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायमअमरावती : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागात मूसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. जिल्ह्यासह विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने सतर्कतेचा इशारा नागपूर विमानतळाच्या हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत तीन ते चार दिवसांपूर्वी तयार झालेल्या कमी दाबाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या ४८ तासांत मूसळधार पावसाची शक्यता वाढलेली आहे. पश्चिम व लगतच्या वायव्य बंगालचा उपसागर व दक्षिण ओडीसा में उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर २४ तासांपूर्वी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण ओडिसा ते उत्तर आंध्रप्रदेश किनारपट्टी लगतच्या पश्चिम व वायव्य बंगालच्या उपसागरावर आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा लाभ मध्य महाराष्ट्रास होणार आहे. पुढील २४ तासात बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. दरम्यान ईशान्य अरबी समुद्र व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होऊन ते आता वायन्य अरबी समुद्र म्हणजेच ओमानच्या दिशेने सरकले आहे. १ जुलैनंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात १ ते २९ जून दरम्यान १४१.१३ मि.मी.पाऊस अपेक्षित असतांना १२५.२६ कि.मी. पाऊस पडला. पावसाची ही ९१.४१ टक्केवारी आहे. तिवस्यात दुसऱ्याही दिवशी मूसळधार अमरावती :शहरासह सर्व तालुक्याच्या मुख्यालयी मंगळवारी ११.५६ मि.मी.पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ६१.४ मि.मी. पाऊस तिवसा येथे पडला. तसेच ग्रामीणमधील ८९ महसूल मंडळात सरासरी १२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी तिवसा तालुक्यातील सरासरी ३७.३ मि.मी. पाऊस पडला. दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस या तालुक्यात पडला आहे. मंगळवारी तिवसा येथे ६१.४ व सोमवारी कुऱ्हा येथे ७५ मि.मी. व वऱ्हा मंडळात १५५ .५ मि.मी.पाऊस पडल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहात आहेत.
४८ तासांत मूसळधार !
By admin | Updated: June 30, 2016 00:03 IST