शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

४७७ शेतकरी सोयाबीन अनुदानास अपात्र

By admin | Updated: May 1, 2017 00:15 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील जवळपास ४७७ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

‘म्हणे मुलाने आणला शेतमाल’ : शेतकरी बचाव समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपरतवाडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील जवळपास ४७७ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरुद्ध शेतकरी बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन न्याय मागण्यात आला आहे.अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये विकलेला सोयाबीन सरकारतर्फे प्रति क्विंटल दोनशे रूपये किमान २५ क्विंटलपर्यंत जाहीर करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्याच्या पावत्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अर्जासोबत जमा केल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील २१५५ शेतकऱ्यांपैकी १६७८ शेतकऱ्यांना पात्र करून २८ हजार क्विंटल सोयाबीन मागे त्यांना ५६ लक्ष रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले तर ४७७ शेतकऱ्यांना अपात्र घोषित करून त्यांना प्रत्येकी दोनशे रुपये क्विंटल मागील अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)समितीने केला अन्यायसोयाबीन विक्रीसाठी आणताना ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याने तो आणायला पाहिजे होता. मात्र वडिलांच्या नावावर शेत असेल तर मुलाने, पत्नीने सोयाबीन विकायला आणला व पावतीवर त्यांचे नाव असण्यासोबत हिशेब पट्टीवरसुद्धा दुसऱ्याचेच नाव असल्याच्या कारणावरून अनुदानापासून अपात्र करण्यात आल्याचा नियम लावण्यात आला. याविरुद्ध शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती देवेंद्र पेटकर, तुळशीदास अपाले, सचिव राहुल गाठेसह आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लाभ देण्याची मागणी केली आहे. शासनाकडून अनुदान देय असताना समितीने अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.त्रिसदस्यीय समितीसोयाबीन अनुदानासाठी सहा. उपनिबंधक, लेखापरीक्षक आणि बाजार समितीचे सचिव अशी त्रिसदस्यीय समिती तयार करण्यात आली होती. सदर समितीला सोयाबीन अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी काही निकष देण्यात आले होते. त्यानुसार या समितीने शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले. सोयाबीन उत्पादकांनी स्वत:च्या नावाने कागदपत्रे सादर केली अशांनाच त्री-सदस्यीय समितीच्या निकषानुसार पात्र केले. मात्र सातबारा नसलेले ४७७ लाभार्थी अपात्र करण्यात आले आहे. - मंगेश भेटाळू, सचिव, बाजार समिती, अचलपूर