शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

८७ सदस्यीय सभागृहात ४७ महिला नगरसेविका

By admin | Updated: February 26, 2017 00:08 IST

अमरावती महापालिकेमध्ये यंदाही महिला नगरसेवकांचा वरचष्मा राहणार आहे.

विलास इंगोलेंची डबल हॅट्ट्रिक : भाजपने दिले ३१ नवे चेहरे अमरावती : अमरावती महापालिकेमध्ये यंदाही महिला नगरसेवकांचा वरचष्मा राहणार आहे. गुरूवारी लागलेल्या निकालात एकूण ८७ नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी ४७ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. यात भाजपच्या सर्वाधिक महिला नगरसेविकांचा समावेश आहे. तर १२ नगरसेविका दुसऱ्यांदा किंवा पाच वर्षाच्या कालावधीनंतर महापालिका सभागृहात पोहोचल्या आहेत.माजी महापौर विलास इंगोले यांनी तब्बल सहाव्यांदा महापालिका निवडणुकीत मिळविलेला विजय या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्ये ठरले आहे. १९९२ ला महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. १९९२-९७, १९९७-२००२, २००२-२००७, २००७-२०१२ आणि २०१२-१७ या २५ वर्षांच्या कालावधीत इंगोले यांनी सभागृहात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या. ते महापौर आणि स्थायी समिती सभापतीही होते. त्यापाठोपाठ रिपाइंचे प्रकाश बन्सोड पाचव्यांदा सभागृहात पोहोचले. चेतन पवार, दिनेश बूब आदींनी विजयाची हॅट्रीक साधली. बबलू शेखावत, प्रशांत वानखडे चौथ्यांदा विजयी होवून महापालिकेत परतले. राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मात्र आरक्षणाचा आकडा ओलांडून अधिक महिला नगरसेविकांनी सभागृहात पाऊल ठेवले. आता सभागृहात ४७ महिला तर ४० पुरूष नगरसेवक आहेत. भाजपच्या तिकिटावर २७, काँग्रेसच्या ८, शिवसेनेच्या तिकीटावर २, बसपाच्या तिकिटावर १, युवा स्वाभिमानवर २ तर ५ महिला नगरसेविका एमआयएमच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. आजपर्यंत कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिलांच्या हाती अमरावतीकरांनी विकासाची दोरी दिली असून त्या विश्वासाला कशा पात्र ठरतात, हे नजिकच्या काळात स्पष्ट होईल. रिना नंदा या माजी महापौरांचा पराभव झाला तर आणखी एक माजी महापौर वंदना कंगाले मात्र पॅनेलसोबत विजयी झाल्या. (प्रतिनिधी)महापालिकेतील महिला शक्तीसुचिता बिरे (भाजप), वंदना मडघे (भाजप), सुरेखा लुंगारे (भाजप), प्रमिला जाधव (भाजप), मंजुश्री महल्ले (काँग्रेस), साहेबबी कय्युम शाह (एमआयएम), सैय्यद नजमुन्निसा (एमआयएम), नीता राऊत (भाजप), माधुरी ठाकरे (भाजप), सोनाली करेसिया (भाजप), सोनाली नाईक (भाजप), रिता पडोळे (भाजप), शोभा शिंदे (काँग्रेस), अस्मा खान (काँग्रेस), पंचफुला चव्हाण (भाजप), माला देवकर (भाजप), जयश्री कुऱ्हेकर (शिवसेना), सुगराबी रायलीवाले (बसपा), जयश्री डहाके (भाजप), लविना हर्षे (भाजप), स्वाती कुळकर्णी (भाजप), संगीता बुरंगे (भाजप), हफीजाबी नुर (काँग्रेस), मो. नसीम बानो (एमआयएम), रजिया खातून (एमआयएम), इंदू सावरकर (भाजप), अनिता राज (भाजप), पद्मजा कौंडण्य (भाजप), रेखा भुतडा (भाजप), सुमती ढोके (युवा स्वाभिमान), गंगा अनभोरे (भाजप), रुबिना तबस्सुम (एमआयएम), अर्चना धामणे (शिवसेना), इशरतबानो (बसपा), स्वाती जावरे (भाजप)सभागृहात पुन्हा पोहोचलेल्या नगरसेविका निलिमा काळे (काँग्रेस), कुसूम साहू (भाजप), वंदना कंगाले (काँग्रेस), सपना ठाकूर (युवा स्वाभिमान), संध्या टिकले (भाजप), राधा कुरिल (भाजप), नूतन भुजाडे (भाजप), सुनिता भेले (काँग्रेस), हफिजाबी युसुफ (काँग्रेस), सुनंदा खरड (भाजप), मंजुषा जाधव (सेना), वंदना हरणे (भाजप).हे विद्यमान जिंकलेबाळू भुयार, निलिमा काळे, धिरज हिवसे, कुसूम साहू, दिनेश बूब, वंदना कंगाले, बबलू शेखावत, सपना ठाकूर, अजय गोंडाणे, चेतन पवार, नूतन भुजाडे, प्रदीप हिवसे, विलास इंगोले, सुनिता भेले, हफिजाबी युसुफ, शेख जफर, प्रशांत वानखडे, मंजुषा जाधव, तुषार भारतीय, वंदना हरणे, सुनील काळे, राजेंद्र तायडे, प्रकाश बन्सोड.तीन स्टँडिंग चेअरमन हरलेअविनाश मार्डीकर यांच्यासह सुगनचंद गुप्ता आणि मिलिंद बांबल हे माजी स्थायी समिती सभापती २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक हरले. त्याचवेळी माजी स्थायी समिती सभापती विलास इंगोले सहाव्यांदा विजयी होवून सभागृहात पोहोचले.