शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४७ कुटुंबांना सानुग्रह मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:40 IST

शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देइमामनगरात वादळ-पावसाने नुकसान : महापौरांच्या हस्ते अनुदानाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.या ठिकाणी रविवारी महापौर संजय नरवणे तसेच आमदार रवि राणा यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार काकडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले होते. यानंतर झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन महापालिकेचे अभियंता करणार आहेत. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी येथील नागरिकांना इतरही मदत कशी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असे सुचित केले आहे. यावेळी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, माजी महापौर मिलिंद चिमोटे, शिक्षण समिती सभापती गोपाल धर्माळे, नगरसेवक विजय वानखडे, राजेश साहू, तहसीलदार संतोश काकडे, मंडळ अधिकारी संजय ढोक, पटवारी अजय पाटेकर, तलाठी चपटे, तलाठी बाहेकर, तलाठी चव्हाण, तलाठी धर्माळे, डॉ. मतीन अहमद, डॉ. नावेद पटेल, अखिल बाबू, जावेद इरशादी, हुसेन खॉ, डॉ. आबीद हुसेन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.सानुग्रह मदतीचा धनादेश अकिलखान मिय्याखान, शेख जफर शेख गफुर, शेख अमीर शेख नबी, सै. तनविर सै.अहमद, अ. जहीर अ. शहीद, अफरोज शेख बब्बू, शेख मुदलाक शेख नसीर, अब्दुल नासीर अब्दुल शब्बीर, जाकीराबी मो. हनिफ, कय्युमशाह अय्युबशाह, शेख आरीफ शेख रहीम, रहेमानशाह अय्युबशाह, सैय्यद रशिद सै. अब्दुल्ला, अन्सारशाह ईरशादशाह, निजामशाह चांदशाह, तसलिमशाह चांदशाह, हफिजखान सुभानखान, साबीरशाह रज्जाकशाह, अब्दुल रशिद मो. याकुब, मोहम्मद अगफाक मो. इशाद, अब्दुल राजीक अ. रशीद, अ. रिहान अब्दुल राजीक, सैय्यद आजम सैय्यद, मोहम्मद सादीक शेख करीम, वसिमशाह कैय्युमशाह, अब्दुल जावेद रशिद, कय्युशा, सैय्यद सलीम सै.भीयु, शेख ईरफान शेख कदिर, शहानाबेगम मारिफ खान, अतिफ खान, अ. रहीक, नाजीमशाह, शमशाद परविन, फराजानकी हुसेन, मोहम्मद अली, आर्बीद खान मिय्याखान, अब्दुल नासीर अब्दुल नासीर, साहेबखाँ, शेख अब्दुल शेख गफ्फार, मुस्साल कुरेशी शेख करीम, राजुभाई, रिजवाना परवीन अली यांना यावेळी देण्यात आला.