शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

४६ युनिटचे बिल ९५,२४० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:35 IST

मीटर रीडिंंग घेणाऱ्या खासगी संस्थांकडून घोळ समोर येत आहे. ममदापूर येथील एका जणाला ४६ युनिटचे देयक तब्बल ९५ हजार २४० रुपये आल्याने या अनागोंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

ठळक मुद्देममदापूर येथील घटना : मीटर रीडिंगवर प्रश्नचिन्ह, ग्राहकांमध्ये असंतोष

सूरज दहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : मीटर रीडिंंग घेणाऱ्या खासगी संस्थांकडून घोळ समोर येत आहे. ममदापूर येथील एका जणाला ४६ युनिटचे देयक तब्बल ९५ हजार २४० रुपये आल्याने या अनागोंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे.तालुक्यातील ममदापूर येथील बाळकृष्ण रामभाऊ शिरपूरकर यांना तर ४६ युनिटचे तब्बल ९५ हजार २४० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. वीज बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे . तिवसा येथील प्रकाश भाऊराव बोके यांना घरगुती विज बिल ५५,१०० रुपये दिले गेले. यासंदर्भात त्यांनी महावितरणकडे तक्रारी केल्या. मात्र, महावितरणच्या तिवसा कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी वीज बिल दुरुस्तीसाठी अर्ज करूनही मीटर बदलून दिले नाही. त्यांच्या रीडिंगमध्ये मोठी तफावत आहे. अखेर त्यांनी ग्राहक मंचात तक्रार करून न्यायाची मागणी केली. यांसह तालुक्यात अनेक ग्राहकांच्या बिलात प्रचंड घोळ असून, मीटर रीडिंगमध्ये चुका आहेत. त्यामुळे ग्राहकांचा रोष वाढला आहे.मीटर रीडिंग घेणाºया संस्थेने केलेल्या चुकीचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे संबंधित वीजग्राहकांना या चुकीच्या वीज बिलांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणने मीटर रीडिंग घेणाºया कंत्राटदारावर कारवाई करून रीडिंग योग्य पद्धतीने घेण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. यासंदर्भात तिवसा येथील महावितरण कंपनीच्या अभियंत्याशी संपर्क होऊ शकला नाही.