अचलपूर : स्थानिक पोलिसांनी शहरातील कादपुरा, फरमानपुरा, जोगीपुरा, बिलनपुरा या ठिकाणी धाड टाकून अवैध विक्रीसाठी ठेवलेले गोमांस जप्त केले. मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
गोमांस कत्तल साहित्यासह ४५७ किलो मांस असा एकूण ६५ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोमांस विक्री करणारे आरोपी वकार नदीम अब्दुल अजीज (२७, रा. बिलनपुरा), सैयद करीम सैयद सुभान (७५, रा. फरमानपुरा), अब्दुल नदीम अब्दुल रज्जाक (२७, रा. कासदपुरा), मोहम्मद हनीफ अब्दुल बशीर (४५, रा. जोगीपुरा) यांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस उपविभागीय अधिकारी पोपटराव अब्दागिरे, अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेश भालेराव, पोलीस उपनिरीक्षक आडे, शीला पटेल, ललिता कासदेकर, पुरुषोत्तम बावनेर, कैलास दाबेराव, आकाश आमले, विशाल थोरात यांनी या कार्यवाहीत भाग घेतला.