उपाययोजना : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्कअमरावती : विविध आजारांचा सलग काही वर्षांपासून होत असलेला उद्रेक नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे आणि पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील सुमारे ४८६ गावे अतिधोक्याची जाहीर करण्यात आली आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्याच्या सोयी सुविधांसंदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जिल्ह्यात अतिधोक्याच्या गावांवर लक्ष ठेवण्याचा आराखडा तयार करण्यात येतो. गावांमध्ये आरोग्याच्या कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक कांचन जगताप यांनी संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा उद्रेक होतो. सलग तीन वर्षांपासून गावांमध्ये आजारांचा झालेला उद्रेक नदी काठावरील गाव तसेच पाण्याचा शुद्धीकरणाच्या अभावामुळे मिळालेल्या लालकार्ड आणि पाणीटंचाई यासारख्या कारणास्तव अशा गावांना अतिधोक्याची गावे म्हणून संबोधले जाते. दरवर्षी अशी अतिधोक्याची गावे जाहीर केली जातात. त्या गावांवर आरोग्य खाते लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करणे, अशी जिल्ह्यात १९०० पेक्षा जास्त गावे आहेत. त्यापैकी ४८६ गावे अतिधोक्यांची गावे म्हणून जाहीर केली आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत अशा गावांची संख्या घटली आहे. मागील पाच वर्षांत अतिधोक्याच्या गावांची संख्या बऱ्यापैकी घटली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजमितीस अमरावती जिल्ह्यात सुमारे ४८६ गावे अतिधोक्याची आहेत. (प्रतिनिधी)अशी आहेत तालुकानिहाय गावसंख्याअमरावती ६३, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर २४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५८, अचलपूर ५५, चांदूरबाजार २६, धामणगाव रेल्वे २७, तिवसा ४८, मोर्शी ३८, वरुड ५१, धारणी ७ तर चिखलदरा तालुक्यातील सर्व गावे पहाडी क्षेत्रात असल्याने येथे नुकसान नाही.दरवर्षी पावसाळ्यात बहुतेक साथरोगाचा अधिक फैलाव नदीपात्रालगतच्या गावांत होतो. त्यामुळे या गावांवर विशेष लक्ष ठेवून आरोग्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. - नितीन भालेराव, आरोग्य अधिकारी, जि.प.
जिल्ह्यात ४५६ गावे अतिधोक्याची
By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST