शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद

By जितेंद्र दखने | Updated: June 16, 2023 19:46 IST

जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे.

अमरावती : जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे. त्यामुळे विभागातील पाच जिल्ह्यात हा विभाग खर्चात हा विभाग अव्वल ठरला आहे. यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन योजनेकरिता हा खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन चालविल्या जाते. या विभागाला सन २०२३ २४ या चालू आर्थिक वर्षांकरिता ५ कोटी ५५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. मार्च २०२३ मध्ये या विभागाला शासनाकडून हा निधी सुपूर्द करण्यात आला.

 सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी १ कोटी ३ लाख ४० हजार, सांडपाणी व व्यवस्थापनासाठी ३ कोटी ९६ लाख वैयक्तिक शौचालयाकरिता ५५ लाख ४० हजारांचा निधी प्राप्त झाला. यामधून सार्वजनिक स्वच्छतागृहाकरिता ७३ लाख ५० हजार,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरिता ३ कोटी ३ लाख व वैयक्तिक शाैचालयाकरिता ४४ लाख २८ हजारांचा निधी या तीन महिन्यातच खर्च करण्यात आला आहे. याची टक्केवारी ८०.६० टक्के एवढी आहे. या खर्चाकरिता मार्च २०२४ पर्यंत मुदत होती. परंतु या विभागाने तीन महिन्यातच हा खर्च करून विभागात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गतिमान खर्च करणाऱ्या तालुक्यांमध्ये चिखलदरा, अमरावती, दर्यापूर आणि वरूड या चार तालुक्यांचा समावेश आहे.या तालुक्यांत शंभर टक्के निधी खर्च झाला आहे. अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्याचा खर्च ९९ टक्क्यांच्या वर आहे. मात्र खर्च करण्यात मोर्शी आणि भातकुली हे दोन तालुके माघारले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागात कामेही प्रगतिपथावरजिल्हा परिषद स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनेंतर्गत कामे केली आहे. जिल्हा परिषद स्वच्छता विभाग पुढे आहे. तीन महिन्यात ४ कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती