शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

४३ कंत्राटदार : स्वच्छतेवर १३ कोटींचा खर्च

By admin | Updated: July 26, 2016 23:57 IST

आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते.

 स्मार्टसिटीचा घाण चेहरा ! अमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे. अन्य ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात स्वच्छता विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत स्वत:ला ‘प्रोजेक्ट’ करणाऱ्या अमरावती महानगराचा चेहरा घाणीने बरबटलेला आहे. शहरात सर्वदूर साचलेले कचऱ्याचे ढीग, त्यावर ताव मारणारी डुकरे, तुंबलेल्या नाल्या आणि गटारी हे चित्र स्वच्छता आणि आरोग्याचा बोजवारा उडाल्याचे दर्शक आहे. महापालिकेच्या ४३ प्रभागात ४३ कंत्राटदारांच्या ११४६ आणि महापालिकेचा सेवेत असलेल्या सफाई कामगारांकडून शहराची साफसफाई करण्यात येते. मात्र, मुस्लिमबहूल क्षेत्र आणि झोपडपट्टीत कधीही कचरा संकलनाची रिक्षा फिरत नाही. इतवारा बाजारातील भाजीपाला मार्केटमधील लाईनमध्ये मृत वराह आणि स्वच्छतेचा उडालेला बोजवारा यंत्रणेवर दोषारोप करणाराच आहे. महापालिकेच्या अखत्यारितील ४३ प्रभागात कमी-अधिक प्रमाणात स्वच्छतेची बोंबाबोंब आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटदारांच्या कामगारांसह महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कार्यरत असताना सुद्धा घाणीने कळस गाठला आहे. कंत्राटदार आणि स्वच्छता कामगारांवर १३ कोटींहून अधिक रक्कम खर्च होत असली तरी अमरावतीकरांना यातून केवळ आजारच मिळतात. इतवारा बाजार व मुस्लिमबहूल परिसरातील परिस्थिती तर अत्यंत विदारक आहे. या भागातील कचरा महिनोन्महिने उचलला जात नाही. टक्केवारीमुळे अभय अमरावती : सफाई कंत्राटदाराला महापालिका महिन्याकाठी २ लाख ५६ हजार रुपयांचा मोबदला देण्यात येतो. महिन्याकाठी ही रक्कम १ कोटी १० लाखांपर्यंत जाते. त्यामुळे शहर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदारांची मनमानी व संबंधितांशी आर्थिक लागेबांधे यामुळे अस्वच्छतेवर कुणीही बोलायला तयार नाही. एकंदरीतच स्वच्छतेबाबतचा कंत्राट आणि अन्य बाबींमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने बहुतांश खासगी कंत्राटदारांना टक्केवारीमुळे अभय दिल्याचा आरोप सर्वश्रुत आहे.