शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

४३९ संस्था निघणार अवसायनात

By admin | Updated: October 4, 2015 00:56 IST

बिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

लोकमत  विशेषगजानन मोहोड अमरावतीबिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. १ जुलैपासून सहकार विभागाने जिल्ह्यातील २३५१ सहकारी संस्थाचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशा संस्थांना आता निबंधकाद्वारा समापन करण्यात येऊन चालू असणाऱ्या संस्थांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण विशेष मोहिमेद्वारे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ३५१ सहकारी संस्थाचे ८४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा ३० सप्टेंबरपर्यंत ९९ टक्के म्हणजेच २ हजार ३२१ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये केवळ १ हजार ८८२ संस्था चालू स्थितीत आढळल्यात, २३६ संस्था बंद आहेत, ८९ संस्थांचे कार्य स्थगित आहे, तर ११४ संस्थांचा ठावठिकाणा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आढळून आलेला नाही. अशा एकूण ४३९ संस्था आता अवसायनात काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतुदीनुसार या कागदोपत्री सहकारी संस्थांवर ही कारवाई केली जाणार आहे.